कमी पाणी पिण्यानं शरीराच्या सर्व कार्यांत अडथळे येतात. पण हे माहित असूनही, पुरेसं पाणी प्यायलं जात नाही. शरीरात पाण्याची कमतरता असताना कोणत्या प्रकारची लक्षणं दिसतात, जेणेकरून तुम्ही वेळेत शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करू शकाल जाणून घेऊया.
Winter Tips : थंडीत चणे - गूळ का खावं ? किती प्रमाणात खावं, वाचा खास विंटर टिप्स
advertisement
केस गळणं - पाण्याअभावी टाळू कोरडा पडतो, यामुळे केस गळतात आणि तकलादू होतात. गेल्या काही दिवसांपासून जास्त केस गळत असतील, तर तुम्ही खूप कमी पाणी पीत असाल.
रक्तातील साखरेची पातळी कमी होणं - शरीरातली पाण्याची कमतरता रक्ताभिसरणावर परिणाम करते. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
मुख दुर्गंधी - दररोज दात घासल्यानंतरही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे पाणी कमी पिण्यामुळे असू शकतं, कमी पाणी प्यायल्यानं तोंड कोरडं पडू शकतं. लाळेचं उत्पादन कमी झाल्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात, ज्यामुळे मुख दुर्गंधी वाढते.
चिंता आणि ताण - शरीर डिहायड्रेट होतं तेव्हा मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि ताण वाढू शकतो.
डोकेदुखी - डिहायड्रेशनमुळे रक्तप्रवाह बिघडतो, ज्यामुळे डोकेदुखी जाणवते आणि डोकं जड झाल्यासारखं वाटतं.
Amla Powder : केस पांढरे होण्याची चिंता सोडा, नैसर्गिकरित्या केस दिसतील काळे
(UTI) लघवी संसर्ग - पाणी कमी प्यायल्याचा परिणाम लघवीवर होऊ शकतो आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
थकवा आणि अशक्तपणा - शरीराला उर्जेसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी पुरेसं नसतं तेव्हा थकवा, आळस आणि अशक्तपणा येतो.
गेल्या काही दिवसांपासून तुमच्या शरीरात असे बदल जाणवत असतील, लघवीचा रंग गडद पिवळा दिसत असेल, वारंवार डोकेदुखी होत असेल, त्वचा कोरडी वाटत असेल, तर शरीरात पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण असू शकतं.
