थंड हवामानात चयापचय क्रिया मंदावते. शरीराचं तापमान राखण्याची गरज असल्यामुळे हे होतं. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि कमी पाणी प्यायल्यानं पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. गरम आणि जड अन्नपदार्थ खाल्ल्यानं पचनक्रियेतही व्यत्यय येतो.
Kidneys: झेरोसिस म्हणजे काय ? याचा तब्येतीवर काय परिणाम होतो ? वाचा हेल्थ टिप्स
advertisement
हिवाळ्यात हंगामी भावनिक विकार म्हणजेच SAD - seasonal affective disorder चाही पचनक्रियेवर परिणाम होतो. हिवाळ्यात जास्त गरम पाणी वापरणं टाळा. यामुळे पचनक्रियेला हानी पोहोचू शकते.
गरम पाणी सतत पिऊ नका. कोमट पाणी वापरा. या ऋतूत वृद्धांना अन्न पचवायला जास्त त्रास होतो. योग्य लक्ष दिलं नाही तर त्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास देखील होऊ शकतो. याचं एक प्रमुख कारण म्हणजे वयानुसार आतडी कमकुवत होणं.
स्नायू तुलनेनं कमकुवत असतात. कमकुवत दातांमुळे चघळणं कठीण होतं. त्यामुळे फायबर असलेलं अन्न खाणं कठीण होतं. याव्यतिरिक्त, मधुमेह आणि मज्जातंतूंच्या समस्याही आतड्यांना कमकुवत करू शकतात. यासाठी सक्रिय राहणं, जड जेवण टाळणं आणि सहज पचणारं अन्न खाणे हे उत्तम ठरतं.
या गोष्टी लक्षात ठेवा:
- रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी अडीच तास आधी करा. यामुळे पोटफुगी आणि अपचन टाळता येईल.
- हळूहळू खा आणि अन्न नीट चावून खा. घाईघाईनं खाणं टाळा.
- हिवाळ्यात चहा आणि कॉफीसारखे जास्त कॅफिन टाळा.
- अल्कोहोलमुळे पचनक्रियेत अडथळा येतो.
Winter Skin Care: हिवाळ्यातही त्वचा राहिल मुलायम, हे DIY मॉईश्चरायझर वापरुन बघा
- नियमित व्यायाम आणि योगामुळे पचनक्रिया सुधारते, आरोग्यासाठी हे खूप आवश्यक आहे.
- दिवसभरात कमीत कमी दोन लीटर पाणी प्या. तहान लागली नसली तरीही पाणी पिणं सुरू ठेवा, अन्यथा डिहायड्रेशन होऊ शकते.
- फायबरयुक्त फळं, बीन्स, डाळी, हिरव्या भाज्या आणि संपूर्ण धान्य असलेले पदार्थ खाणं चांगलं.
- ताक, दही, किमची आणि इतर पदार्थांत प्रोबायोटिक्स असतात, आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असतात.
- हिवाळ्यात तूप वापरणं चांगलं. भाज्या आणि डाळींसोबत खाऊ शकता.
- हिवाळ्यात जड जेवण टाळा. निरोगी आणि सहज पचणारा आहार घ्या.
- ओवा, आलं, दालचिनी, जीरं आणि गरम मसाले वापरा, पण जास्त प्रमाणात नाही.
- गाजर, बीट, संत्री सारखी हंगामी फळं आणि भाज्या खा. यामुळे पचन सुधारण्यासाठी मदत होते.
