पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी–चिखली परिसरात असलेल्या होलसेल मार्केटमध्ये हिवाळ्याच्या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. हूडी, जॅकेट, स्वेटर, मफलर, शॉल, हातमोजे असे विविध प्रकारचे कपडे येथे अनेक व्हरायटीमध्ये मिळत आहेत. स्वस्त दरात कपडे उपलब्ध असल्यामुळे पुणेकरही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
नवरा-नवरी तयार, वऱ्हाडीही जमले, पण विवाह नोंदणी अधिकाऱ्याची ती अट, अन् सगळ्यांनाच फुटला घाम! शेवटी..
advertisement
या मार्केटमध्ये तुम्हाला 20 ते 25 टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे. प्रत्येक कपड्यावर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याने हिवाळ्याच्या खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. साधारणपणे 900 रुपयांना मिळणारी हूडी येथे फक्त 500 रुपयांत उपलब्ध आहे. ट्रॅकसूट देखील तुम्हाला 500 रुपयांच्या दरात मिळत आहे. महिलांसाठी खास स्वेटर देखील 500 रुपयांच्या रेंजपासून मिळतात.
आकुर्डी-चिखली परिसरातील या मार्केटमध्ये पुरुष, महिला आणि मुलांसाठी स्वतंत्र सेक्शन ठेवण्यात आले आहेत. विविध रंग, साइज आणि डिझाइन्समध्ये नवीन स्टॉकही उपलब्ध झाला आहे. दररोज नवीन माल येत असल्याने ग्राहकांना भरपूर व्हरायटीज या ठिकाणी मिळत आहेत.





