हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं विशेष महत्वाचं आहे. कारण थंड वारे त्वचेतला ओलावा हिरावून घेऊ शकतात आणि त्वचा कोरडी होऊ शकते. आवळा, पालक, गाजर, बीट यासारखे पदार्थ आहारात असणं त्वचेसाठी चांगलं. पाहूयात यात त्वचेसाठी आवश्यक कोणते महत्त्वाचे घटक असतात.
Health Tips : नवीन वर्षासाठीचा वेट लॉस मंत्रा, वजन कमी करण्यासाठी हेल्थ टिप्स
advertisement
आवळा - आवळ्या व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे दररोज एक आवळा खाल्ल्यानं खराब झालेल्या त्वचेच्या पेशी दुरुस्त होतात आणि त्वचा उजळते. याशिवाय, त्यात फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, बी-कॉम्प्लेक्स, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रथिनं यासारखे आवश्यक पोषक घटक असतात.
गाजर - गाजर हे रेटिनॉलचा नैसर्गिक स्रोत आहे. गाजरामुळे त्वचा गुळगुळीत होण्यास मदत होते. त्यात बीटा-कॅरोटीन देखील असतं, नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी हे उपयुक्त आहे. त्वचा चमकदार राहावी यासाठी, गाजर खाऊ शकता किंवा गाजराचा रस पिऊ शकता.
बीट - बीटात व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि काळे डाग आणि रंगद्रव्य यासारख्या समस्या कमी होतात.
Dandruff : केसांतला कोंडा घालवण्यासाठी पारंपरिक उपाय, जाणून घ्या कापराचे फायदे
रताळं - रताळं त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतं. त्यात व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन असतं, यामुळे कोलेजन वाढवण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचेची दुरुस्ती होण्यास मदत होते आणि निस्तेजपणा दूर होतो.
पालक - पालक दररोज खाल्ल्यानं रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. यामुळे त्वचा खोलवर हायड्रेट राहते. मुरुमे, डाग आणि टॅनिंग काढून टाकण्यासाठी पालक उपयुक्त आहे.
