शारीरिक संबंधांनंतर महिलांनी टाळायच्या 6 गोष्टी
लगेच लघवीला जाणे टाळू नका
शारीरिक संबंधांनंतर लगेच लघवीला जाणे सर्वात महत्त्वाचे आहे. असे केल्याने मूत्रमार्गात प्रवेश केलेले कोणतेही हानिकारक जीवाणू बाहेर पडण्यास मदत होते. लघवीला थांबवल्यास हे जीवाणू मूत्राशयात वाढू शकतात, ज्यामुळे यूटीआय (UTI) होण्याचा धोका वाढतो.
योनी आतून धुणे (Douching) टाळा
अनेक महिलांना योनी आतून धुण्याची सवय असते. पण, हे करणे पूर्णपणे चुकीचे आहे. योनीची नैसर्गिक पीएच पातळी आणि चांगले जीवाणू यामुळे बाधित होतात, ज्यामुळे हानिकारक जीवाणूंची वाढ होऊन संसर्गाचा धोका वाढतो.
advertisement
परफ्यूमयुक्त साबणाचा वापर टाळा
शारीरिक संबंधांनंतर योनीचा भाग स्वच्छ करण्यासाठी साधा कोमट पाण्याचा वापर करावा. परफ्यूमयुक्त किंवा रासायनिक साबणांचा वापर टाळावा. अशा साबणांमुळे योनीच्या नाजूक भागातील त्वचा कोरडी होऊ शकते आणि जळजळ होऊ शकते.
टाइट किंवा सिंथेटिक अंतर्वस्त्र घालू नका
शारीरिक संबंधांनंतर लगेच घट्ट किंवा सिंथेटिक कपड्यांचे अंतर्वस्त्र घालणे टाळावे. यामुळे योनीच्या भागात हवा खेळती राहत नाही आणि ओलावा टिकून राहतो, ज्यामुळे जीवाणू आणि बुरशीची वाढ होते. सुती आणि सैल अंतर्वस्त्र घालणे योग्य आहे.
ओल्या किंवा घाम असलेल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहू नका
व्यायामासारख्या शारीरिक हालचालींनंतर घामाचे कपडे लगेच बदलणे आवश्यक आहे. ओलावा आणि घाम यामुळे जिवाणूंची वाढ होते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
ओरल सेक्स करताना स्वच्छता बाळगा
ओरल सेक्स करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. यामुळे जीवाणूंचा प्रसार होऊ शकतो, ज्यामुळे महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. वरील साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतल्यास महिलांचे लैंगिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. कोणत्याही प्रकारची समस्या जाणवल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)