TRENDING:

World Yoga Day: योग संदर्भात 5 सर्वात मोठ्या अफवा, कधीच ठेवू नका विश्वास; तज्ज्ञांनीही सांगितलंय खरं काय

Last Updated:

World Yoga Day: चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या लठ्ठपणा, कंबर, मान आणि पायदुखीच्या समस्या किंवा चुकीच्या पोश्चरमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. योगाविषयी लोकांच्या मनात काही समज आणि गैरसमज आहे. त्यामुळे लोक फिटनेससाठी योगासनं करायला थोडं घाबरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आरोग्यासाठी योगासनं आणि मेडिटेशन लाभदायक मानलं जातं. यामुळे शारीरिक आणि मानसिक फिटनेस मिळतो; पण योगाविषयी अनेकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो. या खास दिनानिमित्त योगासंबंधी असलेले गैरसमज आणि सत्य स्थितीविषयी सविस्तर जाणून घेऊ या. '
News18
News18
advertisement

दर वर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो. योगाच्या फायद्यांविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत योगामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहू शकता. रोज थोडा वेळ काढून योगाभ्यास केला तर चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या लठ्ठपणा, कंबर, मान आणि पायदुखीच्या समस्या किंवा चुकीच्या पोश्चरमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.

advertisement

योगाविषयी लोकांच्या मनात काही समज आणि गैरसमज आहे. त्यामुळे लोक फिटनेससाठी योगासनं करायला थोडं घाबरतात. योगासनं हा केवळ महिला आणि वृद्ध व्यक्तींसाठीच असतात, यामुळे बॉडी कट आणि व्हेन्स दिसत नाहीत, योगासनं बोअरिंग असतात, योगासनं केवळ सकाळीच करावीत, असे काही गैरसमज लोकांच्या मनात असतात.

योगासनं केवळ महिलाच करतात, हाही समज अनेकांमध्ये आहे. तज्ज्ञांच्या मते, योगासनं ही लिंग आधारित म्हणजेच स्त्री-पुरुषांसाठी वेगवेगळी नाहीत. यासाठी महागडी उपकरणं किंवा यंत्रसामग्रीची गरज नसते. योगा करण्यासाठी हवेशीर, स्वच्छ जागा आणि योगा मॅट असणं गरजेचं आहे. महिला आणि पुरुषांमधला मानसिक आणि शारीरिक तणाव कमी करण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरू शकतात.

advertisement

योगासनं केवळ सकाळीच केली जातात, हा एक समज असतो. खरं तर योगासनं सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयादरम्यान करणं योग्य मानलं जातं; पण याचा अर्थ असा नाही, की केवळ सूर्योदयावेळी योगासनं करावीत. तुम्ही सू्र्यनमस्कारांविषयी ऐकलं असेल; पण चंद्र नमस्कार तुम्हाला माहिती नसतील. हा गैरसमज दूर करण्यासाठी हा एकमेव घटक पुरेसा आहे. जिमप्रमाणे योगासनं कोणत्याही वेळी करता येतात; पण ती करण्यापूर्वी जेवण एक ते दोन तास आधी झालेलं असावं.

advertisement

योगतज्ज्ञ सुगंधा गोयल यांनी सांगितलं, की योगासनं केवळ प्रौढ व्यक्तींसाठी असतात, हा एक मोठा गैरसमज आ्हे. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत कुणीही योगासनं करू शकतं. योगाच्या माध्यमातून आरोग्यासह आपल्या ऊर्जेचा वापर पूर्ण क्षमतेनं करता येतो. ऊर्जेचा वापर झाला नाही तर काही अॅलर्जी विकसित होऊ शकतात. हा त्रास केवळ औषधांच्या माध्यमातून बरा होत नाही.

advertisement

योगासनं स्नायूंसाठी उपयुक्त असतात. अतिरिक्त चरबी कमी करून स्नायूंना आकार देण्यासाठी, तसंच सर्व अवयवांचं आरोग्य सुधारण्यासाठी योगासनं उपयुक्त ठरतात. अनेक योगासनं अशी आहेत, जी स्नायूंना पंप करतात. त्यामुळे नैसर्गिक कट दिसू शकतात. यासाठी हँड स्टँडसारखा व्यायाम सुचवला जातो. यात वजन उचलावं लागतं. हे वजन तुम्हाला हातात धरून ठेवावं लागतं.

काहींच्या मते योगासनं करणं बोअरिंग किंवा कंटाळवाणं असतं; पण असं नाही. योगासनांचे बरेच प्रकार आहेत. ते तुम्ही वेगवेगळ्या दिवशी करू शकता. काही योगासनं हातावर, तर काही डोक्याचा आधार घेऊन उभी राहून केली जातात. त्यांचे परिणाम लगेच दिसत नाहीत. काही दिवसांनंतर फरक जाणवू लागतो.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World Yoga Day: योग संदर्भात 5 सर्वात मोठ्या अफवा, कधीच ठेवू नका विश्वास; तज्ज्ञांनीही सांगितलंय खरं काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल