TRENDING:

सुंदर नेल एक्सटेंशन करा आता घरच्या घरी: 'इथं' 80 रुपयांपासून खरेदी वस्तू

Last Updated:

मेकअपनंतर अधिक मागणी नख सुंदर रंगवण्यासाठी लागणाऱ्या नेल पॉलिशला आहे. त्यामुळे नेल एक्सटेंशन वस्तू तुम्हाला डोंबिवलीत स्वस्तात कुठे खरेदी करता येतील याबद्दल माहिती देणार आहोत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
लतिका तेजाळे, प्रतिनिधी
advertisement

ठाणे : कॉस्मेटिक्स आता फक्त चेहऱ्यापुरती मर्यादित नसून अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत विस्तारित झाले आहे. मेकअपनंतर अधिक मागणी नख सुंदर रंगवण्यासाठी लागणाऱ्या नेल पॉलिशला आहे. फक्त नेलपॉलिशच नव्हे तर आर्टिस्ट आता नखांवर वेगवेगळे प्रयोग करून त्यांना वाढवतात. वेगवगळे आकार देतात. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाने कलाकृती करतात. त्यामुळे महिलावर्ग या नवीन नेल एक्सटेंशन प्रकाराला अधिक आकर्षित होत आहेत. त्यामुळे पण हे नेल एक्सटेंशन कुठल्या पार्लरमध्ये करायला गेल्यास 1 हजार रुपये प्रत्येकी 10 नखांचे आकारले जातात. त्यामुळे अनेक महिला हेच नेल एक्सटेंशन  घरच्या घरी करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे नेल एक्सटेंशन वस्तू तुम्हाला डोंबिवलीत स्वस्तात कुठे खरेदी करता येतील याबद्दल माहिती देणार आहोत. 

advertisement

डोंबिवलीतील स्टेशन रोड जवळ असलेल्या एंजल्स ब्युटी सेंटर या ठिकाणी स्वस्तात नेल एक्सटेंशन वस्तू खरेदी करता येतील. हे दुकान महिलांच्या कॉस्मेटिकसचे होलसेल दुकान आहे. त्यामुळे रिटेल किंमती पेक्षा कमी किंमतीत या ठिकाणी विविध वस्तू एकाच छताखाली खरेदी करता येतील. या ठिकाणी महिलांच्या नखांसाठी लागणारे प्रत्येक प्रकारचे टूल्स, नेलपॉलिश, चमकी आणि ब्रश इत्यादी सर्व प्रकारचे सामान अवघ्या 80 रुपयांच्या किंमती पासून खरेदी करता येईल.

advertisement

फक्त 270 रुपयांपासून मिळतंय जॅकेट, घास बाजारमधील सर्वास्त स्वस्त डेनिम गल्ली, Video

कोण कोणत्या आहेत वस्तू?

येथे शाईन नेलपॉलिश, जेलपॉलिश, म्याट फिनिश इत्यादी प्रकारच्या नेलपॉलिशचे 330 शेडकलर मिळतील. त्या सोबतच नेल स्ट्रिप्स, डॉटिंग टूल, नेल आर्ट स्टिकर्स, ग्लिटर, मॅनिक्युअर सेट, नेल पॉलिश रिमूव्हर, ब्रश, मॅट टॉपकोट, नेल आर्ट ब्रश, 3D नेल आर्ट स्टिकर्स, नेल क्रिस्टल्स, नेल फाइल, नेल फॉइल, नेल पॉलिश दुरुस्त करणारे पेन, नेल पॉलिश, स्टॅम्पर्स, चिमटा, क्रोम नेल पावडर, डिप पावडर किट, फॉल्स नेल्स, नेल आर्ट डॉटिंग टूल सेट, नेल आर्ट वॉटर डिकल्स, क्युटिकल्स इत्यादी वस्तू 80 रुपयांपासून खरेदी करता येतील.

advertisement

कमीत कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा; हा व्यवसाय करेल महिन्यात मालामाल video

नवख्या नेल आर्टिस्टसाठी हे ठिकाण नक्कीच एक उत्तम पर्याय आहे. कारण रिटेलमध्ये नेलार्टसाठी लागणार पूर्ण सेट हा 15 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पण तोच सेम सेट आपल्याला या ठिकाणी फक्त 7 हजार 500 रुपयांच्या खरेदी करता येईल. या सेटमध्ये 60 वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपॉलिश मिळतात. त्यासोबत टॉपकोट, बेसकोट, प्रायमर, डिहायड्रेटेड आणि टॉपम्याट या 5 वस्तू फ्री मिळतात. सोबतच लेझर लॅम्प देखील फ्री मिळेल, अशी माहिती या दुकानाचे व्यवस्थापक कृष्णा पटेल यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सुंदर नेल एक्सटेंशन करा आता घरच्या घरी: 'इथं' 80 रुपयांपासून खरेदी वस्तू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल