TRENDING:

हिवाळ्यासाठी स्वेटर हवाय? छ. संभाजीनगरमधील तिबेटीयन मार्केटमध्ये फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी

Last Updated:

तुम्ही जर स्वस्त दरात कपडे खरेदी करत असेल तर तुम्ही शहरातील तिबेटीयन मार्केटमध्ये जाऊनही कपडे खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये थंडीसाठी लागणारे सर्व कपडे उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
advertisement

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आता सर्वत्र थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. थंडी पडायला सुरुवात झाली की आपण सर्वजण  नवीन स्वेटर, मफलर आणि थंडीसाठी लागणाऱ्या सर्व कपड्यांची खरेदी करतो. तुम्ही जर स्वस्त दरात कपडे खरेदी करत असेल तर तुम्ही शहरातील तिबेटीयन मार्केटमध्ये जाऊनही कपडे खरेदी करू शकता. या ठिकाणी तुम्हाला अगदी स्वस्त दरामध्ये थंडीसाठी लागणारे सर्व कपडे उपलब्ध आहेत.

advertisement

छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी तिबेटियन मार्केट सुरू झालेले आहे. या ठिकाणी हिवाळ्यासाठी लागणारे सर्व कपडे उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्हाला स्वेटर, जॅकेट्स, शॉल, मफलर, हात मौजे, टोपी हे सर्व कपडे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत.

कमळ की तुतारी? कुणी केलंय मार्केट जाम? पुण्यातील झेंडेवाल्याच्या दुकानातून थेट Video

advertisement

स्वेटर, जॅकेट्सची खरेदी तुम्ही 300 रुपयांपासून याठिकाणी करू शकता. अगदी उलनपासून बनवलेली शॉल ही उपलब्ध आहे. अगदी अडीचशे रुपयांपासून ते हजार रुपयांच्या आतपर्यंत या सर्व शॉलच्या किंमती आहेत. यामध्ये तुम्हाला वर्क वाली शॉल त्याचबरोबर साधी शॉल अशी विविध प्रकारच्या शॉल या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत. 

महिलांसाठी या ठिकाणी जॅकेट, स्वेटर, कान टोपी अशा सगळ्या प्रकारचे कपडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांसाठी देखील हिवाळ्यासाठी लागणारे सगळे कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी जॅकेट, टोपी असे सगळे कपडे या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाचे दर घसरले, कांद्याला भाव वाढ नाहीच, केळीची काय स्थिती?
सर्व पहा

त्यासोबतच पुरुषांसाठी देखील मफलर, हॅन्ड ग्लोज, स्वेटर, जॅकेट, जर्किन, टोपी हे सर्व कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्हाला सुद्धा हे खरेदी करायचं असेल तर तुम्ही संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या तिबेटीयन मार्केटमध्ये जाऊन खरेदी करू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
हिवाळ्यासाठी स्वेटर हवाय? छ. संभाजीनगरमधील तिबेटीयन मार्केटमध्ये फक्त 300 रुपयांपासून करा खरेदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल