कमळ की तुतारी? कुणी केलंय मार्केट जाम? पुण्यातील झेंडेवाल्याच्या दुकानातून थेट Video

Last Updated:

Assembly Election: निवडणुकीत विविध राजकीय पक्षांच्या झेंडे, उपरणे, टोप्या आदी साहित्याला मोठी मागणी असते. यंदा पुण्यातील मार्केटमध्ये कोण भाव खातंय? हे जाणून घेऊ.

+
कमळ

कमळ की तुतारी? कुणी केलंय मार्केट जाम? पुण्यातील झेंडेवाल्याच्या दुकानातून थेट Video

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राजकीय नेत्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. येत्या 20 तारखेला मतदान असून त्यासाठी प्रचाराच्या विविध युक्त्या वापरल्या जात आहेत. या काळात पक्षांची चिन्हे असणारे झेंडे, उपरणे, टोप्या आणि इतर उपकरणांना मोठी मागणी असते. पुण्यात मुरुडकर झेंडेवाले हे गेल्या कित्येक वर्षांपासून झेंडे विक्रीचा व्यवसाय करतात. यंदा या प्रचार साहित्यात काय खास ट्रेंड आहे? याबाबत गिरीश मुरुडकर यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात प्रचाराचं साहित्य खरेदी केली जातंय. उपरणे, झेंडे आणि बॅचची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पंजा, तुतारी, मशाल, घड्याळ, धनुष्यबाणला जोरात मागणी आहे. तसेच विविध राजकीय पक्षांचे फेटे, पगड्या देखील तयार करण्यात आल्या आहेत.उपरण्यांचेही खास प्रकार तयार असून सामान्य कार्यकर्ता ते पक्षाचे प्रमुख नेते यांना घालण्यासाठी विविध प्रकारची उपरणी उपलब्ध आहेत, असे मुरुडकर झेंडेवाले सांगतात.
advertisement
फोल्डिंग तुतारीला मागणी
सध्या फोल्डिंगमध्ये तुतारी बनवली आहे. ही तुतारी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे फोल्डिंग तुतारीला मोठी मागणी असल्याचं गिरीश मुरुडकर सांगतात. तसेच मोठ्या राजकीय नेत्यांसाठी डिझायनर पगडींना देखील मागणी आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांची चिन्हे, चिन्हांच्या टोप्या, उपरणे, शाल, झेंडे, बॅच बिल्ले यांना देखील मागणी वाढलीये. यामध्ये पारंपरिक झेंड्यांपेक्षा वेगळ्या डिझायनर झेंडे आणि इतर साहित्याला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सर्वच साहित्य खरेदीसाठी यंदा मोठी गर्दी होतेय, असंही त्यांनी सांगितलं.
advertisement
झेंडे आणि साहित्याचे दर काय?
पुण्यात 3 बाय 4.5, 4 बाय 6, 2 बाय 3 फुटची उपरणे उपलब्ध आहेत. त्यांचा साधारणपणे 8-10 रुपये दर आहे. तर एका बॅचची किंमत ही 5 ते 150 रुपयांपर्यंत आहे. यामध्ये प्लास्टिक, डायमंड, मेटल बॅच पाहायला मिळतात. तर टोपी 10 रुपयांपासून  60 रुपयांपर्यंत मिळतेय. डिझायनर पगडी ही एक हजार रुपये पासून 5 हजार रुपयांपर्यंत मिलतेय. तर शालीची किंमत ही 300 रुपये आहे. यंदा सर्वच साहित्याला चांगली मागमी असल्याचं गिरीश मुरुडकर झेंडेवाले यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कमळ की तुतारी? कुणी केलंय मार्केट जाम? पुण्यातील झेंडेवाल्याच्या दुकानातून थेट Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement