60 वर्षांपासून या ठिकाणी निवडणूक झाली नाही, बिनविरोध निवडला जातो सरंपच, खास आहे कारण

Last Updated:

Unopposed Sarpanch Election - भारतात निवडणुका म्हटल्यावर सर्वात मोठा उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येक निवडणुक याठिकाणी एका सणासारखी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार मोठ्या ताकदीने प्रयत्न करतात. तर काही ठिकाणी वादही झाल्याचे पाहायला मिळतात. मात्र, काही ठिकाणे अशी असतात, जिथे एकता आणि सामूहिक भावनेचा आदर्श पाहायला मिळतो.

बिनविरोध सरपंच निवडणूक (प्रतिकात्मक फोटो)
बिनविरोध सरपंच निवडणूक (प्रतिकात्मक फोटो)
अमृतसर : भारतात निवडणुका म्हटल्यावर सर्वात मोठा उत्साह पाहायला मिळतो. प्रत्येक निवडणुक याठिकाणी एका सणासारखी पाहायला मिळते. जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवार मोठ्या ताकदीने प्रयत्न करतात. तर काही ठिकाणी वादही झाल्याचे पाहायला मिळतात. मात्र, काही ठिकाणे अशी असतात, जिथे एकता आणि सामूहिक भावनेचा आदर्श पाहायला मिळतो.
आज अशाच एका गावाबाबत आपण जाणून घेणार आहोत, जिथे मागील 60 वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होत आहे. या गावात कोणताही प्रकारचा वाद होत नाही. लोक याठिकाणी मिळून मिसळून नेतृत्त्व करतात. त्यांनी निवडलेला नेता गावातील विकासात योगदान देईल, याच आशेने गावातील लोक सरपंचाची निवड करतात.
60 वर्षांपासून एकमताने निवडणूक
अमृतसर जिल्ह्यातील बोहरवाला गावात मागील 60 वर्षांपासून लोकांच्या बिनविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. यावेळीही गावातील लोकांनी मोठे पाऊल उचलत मनप्रीत सिंग “मन्नू माळी” यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. यानिमित्ताने त्यांनी गावातील गुरुद्वारा साहिबला भेट देऊन वाहेगुरुंचे आभार मानले.
advertisement
निवडीनंतर सरपंच काय म्हणाले -
गावाचे नवीन सरपंच मनप्रीत सिंह यांना आशीर्वाद देताना गावकऱ्यांनी ते गावाच्या विकासासाठी योगदान देतील आणि गावाला सुंदर बनवतील अशी आशा गावकऱ्यांनी व्यक्त केली. तर गावकऱ्यांच्या एकजुटीने मी सरपंच बनलो आहे. मी त्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. तसेच गावाला त्यांनी याप्रसंगी महत्त्वाचे आश्वासनही दिले.
advertisement
आपण गावाच्या विकासासाठी मिळून मिसळून काम करू. तसेच तरुण हे व्यवनापासून दूर राहतील आणि आरोग्यदायी राहतील यासाठी त्यांनी तरुणांसाठी जिम बनवण्याचे वचन नवनियुक्त सरंपच मनप्रीत सिंह यांनी दिले. अशाप्रकारे या गावाने पुन्हा एकदा बिनविरोध निवडणूक करत एकतेचे प्रदर्शन केले.
मराठी बातम्या/Viral/
60 वर्षांपासून या ठिकाणी निवडणूक झाली नाही, बिनविरोध निवडला जातो सरंपच, खास आहे कारण
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement