ठाणे : लग्न म्हटलं की खरेदी आलीच. कमी बजेटमध्ये बस्ता बांधायचा विचार लग्नासाठी केला जातो. या बस्त्यामध्ये महिला शालू, रिसेप्शन डिझायनर साडी, पैठणी, सेमी पैठणी, नऊवार साडी खरेदी करतात. मात्र, या साड्यांची किंमत जास्त असल्यामुळे बजेटमध्ये या साड्या कुठे मिळतील याचा शोध घेतला जातो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला ठाण्यात कमी बजेटमध्ये साड्या कुठे खरेदी करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत.
advertisement
ठाणे पश्चिम येथील मौसम या दुकानात तुम्हाला साड्यांमध्ये अनेक प्रकारची व्हरायटी पाहायला मिळेलं. या दुकानांत साडीच्या किंमती फक्त 260 रुपयांपासून सुरु होतात. कॉटन स्लिक साडीची किंमत 260 रुपयांपासून होते. गिफ्टींगच्या साड्यांची किंमत 500 रुपयांपासून सुरु होते. तर सेमी पैठणीची किमंत 800 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंत आहे. तसेच सिल्क पैठणीची 3500 रुपयांपासून किंमत सुरु होते. ओरिजनल कडियाल पैठणीची किंमत 9000 तर ओरिजनल तसेच संपूर्ण भरजरी वर्क असलेली कांजिवरम साडीची किंमत सुरु 6000 रुपयांपासून होते.
लग्नासाठी सेलिब्रिटी स्टाइल नऊवारी मिळते तेही शेला आणि कंबरपट्ट्यासहित मिळते. तसेच सिल्कमध्ये असलेल्या नऊवारची किंमत 1700 ते 1800 रुपयांपासून होते. तर, रिसेप्शन किंवा पार्टीवेअर असणाऱ्या डिझाइनर साड्यांची किंमत सुरु 3000 रुपयांपासून होते. बनारसी साड्यांमध्येही खूप व्हरायटी पाहायला मिळते, अशा प्रकारे इथे साड्यांमध्ये हजारो व्हरायटी पाहायला मिळतात.
फॅशन जुनी पण ट्रेंड नवा! मुंबईची आदिती जपतेय खणाची संस्कृती, Video
दरम्यान इथे फक्त साड्याच नाहीतर तर, भरजरी वेडींग लेहंग्यामध्येही अनेक प्रकारचे पॅटर्न कमी किंमतीत पाहायला मिळतात. शॉपिंग आणि तेही साड्यांची म्हटलं की महिलांचा अगदी जवळचा विषय. त्यामुळे महिलांना जर साड्यांमध्ये नवीन काही पर्याय हवे असतील, युनिक कलेक्शन हवं असेल तर ठाण्यातील या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.