मुंबईच्या प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केटमधील लोहार चाळीतील काका हँगर्स हे दुकान अशा गरजांची पूर्तता करत आहे. पावसाळ्यात घरात कपडे वाळवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू येथे अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत. केवळ 50 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या वस्तूंचा दर्जाही उत्तम असून, त्या प्रत्येक घरासाठी उपयुक्त ठरत आहेत.
advertisement
इथे मिळणाऱ्या वस्तूंमध्ये प्लास्टिक, मेटल आणि अँटी-स्लिप हँगर्स, मजबूत व टिकाऊ क्लिप्स, फोल्डेबल आणि स्टॅकेबल क्लॉथ ड्रायर्स, लवचिक आणि मजबूत रश्या यांचा समावेश आहे. तसेच किचनसाठी उपयुक्त हुक्स, स्टँड्स, हँगिंग ट्रे आणि इतर स्टोरेज सोल्युशन्सही येथे उपलब्ध आहेत.
किंमती अगदी परवडणाऱ्या आहेत. प्लास्टिकचे 6 हँगर्स 50 रुपये, 24 क्लिप्स 70 रुपयांना, स्टीलचे 12 क्लिप्स 80 रुपयांना, वुडेन हँगर्स 600 रुपये डझन, नायलॉन रस्सी 50 ते 80 रुपये, लहान मुलांचे हँगर्स 80 ते 150 रुपयांमध्ये तर क्लॉथ ड्रायर्स स्टँड 800 रुपयांपासून सुरू होतात.
या वस्तू केवळ कपडे वाळवण्यासाठी नव्हे, तर घरात कमी जागेचा जास्त उपयोग करण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे या पावसाळ्यात घरात कपडे वाळवण्याची सोय हवी असेल, तर काका हँगर्स क्रॉफर्ड मार्केट येथे एकदा तरी अवश्य भेट द्या.