डोंबिवली : डोंबिवलीत अनेक जुने व्यवसाय पाहायला मिळतात. त्यातीलच एक व्यवसाय म्हणजे जय महाराष्ट्र मसाले यांचा मसाल्यांचा व्यवसाय. जेवणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मसाला. त्यावरच जेवणाची चव टिकून असते, परंतु आता चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जो मसाला वर्षानुवर्ष वापरत आला आहात त्याच प्रकारचा मसाला तुम्हाला आता मिळणार आहे.
डोंबिवली स्थानकापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या घरडा सर्कल जवळच आजदे गाव आहे. या आजदे गावातील दत्त मंदिराजवळच हे जय महाराष्ट्र मसाले नावाचे दुकान आहे. रामचंद्र गायकवाड यांची दुसरी पिढी सध्या हा मसाल्यांचा व्यवसाय करत आहे. यांच्या इथे मिळणारे सगळे मसाले हे कुटुंब स्वतः बनवत. यामध्ये आगरी मसाला, कोल्हापुरी मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. मसाल्यांसोबत आधी ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि पापड सुद्धा मिळतील. हे सुद्धा सर्व हे कुटुंब घरी बनवत. त्यामुळे डोंबिवलीमध्ये परंपरागत चालत आलेल्या व्यवसायात जय महाराष्ट्र मसाले यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
advertisement
सुपरफूड बाजरी! हिवाळ्यात नक्की करा आहारात समावेश, एक-दोन नाही असंख्य फायदे
जय महाराष्ट्र मसाले यांचा मसाला अगदी हॉटेलपासून ते सामान्य माणसांच्या घरात सुद्धा वापरला जातो. डोंबिवलीकरांचे मसाल्याला पसंती मिळते याचं प्रमुख कारण म्हणजे यांच्या इथे पाळल जाणार हायजिन. इथे 500 रुपयांपासून मसाल्यांची किंमत सुरू होते. यामध्ये तुम्हाला लसूण चटणी 500 रुपये किलो, मालवणी मसाला 600 रुपये किलो, आगरी मसाला 700 रुपये किलो, घाटी मसाला 600 रुपये किलो अशा मसाल्यांच्या किंमती आहेत. त्यांचा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे सगळे तयार होणारे मसाले कांडपवर व्यवस्थित कुटून मिळतात.
'आमच्याकडे सगळे रेग्युलर मसाले भाजून, कुटून मिळतात. काहींना लगेचच मसाले कुटून हवे असतात, तर आम्ही दोन तासात सुद्धा त्यांना हवा असणारा मसाला बनवून देतो. बेडगीमध्ये आम्ही सगळ्या मिरच्या व्यवस्थित धुवून, स्वच्छ प्रकारे मसाले बनवतो. त्यामुळे गिराईक अगदी विश्वास आणि आमच्याकडे येतात 'असे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले.'