TRENDING:

Valentine Day: खरंच प्रेम आंधळं असतं? तुमचेही डोळे पाणावतील अशी डोळस Love Story

Last Updated:

Valentine Day Special: एक अंध प्रेमी जोडपं गेल्या दोन वर्षांपासून सुखी संसार करत आहे. खरंतर त्यांच हे प्रेम डोळस व्यक्तींना देखील डोळसपणे प्रेम करायला भाग पडणारं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर – ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं,’ असं मंगेश पाडगावकर यांनी कवितेच्या माध्यमातून म्हटलंय. पण खरच तुमचं आमचं सेम असतं का हा प्रश्न आहे? कारण सोलापूर शहरातील निराळे वस्ती येथील एक अंध प्रेमी जोडपं गेल्या दोन वर्षांपासून सुखी संसार करत आहे. खरंतर त्यांच हे प्रेम डोळस व्यक्तींना देखील लाजवणारं असून त्यांना डोळसपणे प्रेम करायला भाग पडणारं आहे. पांडुरंग खरसोडे आणि उज्ज्वला खरसोडे असे या अंध प्रेमी युगलाचे नाव असून या दोघांची प्रेम कहाणी नक्कीच प्रेरणा देणारी आहे. व्हलेंटाईन डेनिमित्त लोकल18 च्या माध्यमातून याच डोळस जोडप्याशी संवाद साधला आहे.

advertisement

पांडुरंग खरसोडे आणि उज्ज्वला खरसोडे दोघेही दृष्टिहीन. चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेत शिकत होते. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेताना गप्पा झाल्या. एकमेकांना पाहूच शकत नव्हते. परंतु मने अशी जुळली की, एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मात्र दोघेही अंध असल्याने घरच्यांना चिंता होती. त्यामुळे काही काळ विरोध देखील झाला. परंतु, प्रेम फुलत गेलं आणि एके दिवशी लग्न ठरलं. इतके झटपट की, सकाळी 9 वाजता साखरपुडा, दुपारी 12 वाजता हळद आणि सायंकाळी अक्षता पडल्या, असं उज्ज्वला सांगतात.

advertisement

पिच्चरटाईप Love Story! त्यांनी लग्न केलं अन् गावात कलम 144 लागलं, मग जे झालं...

पांडुरंग खरसोडे यांनी एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर अहमदाबाद येथे दोन वर्षे राहून फिजिओथेरपीचा कोर्स पूर्ण केला. सध्या ते सोलापुरात प्रॅक्टीस करतात. तर उज्ज्वला खरसोडे यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. उज्ज्वलाला घर स्वच्छ ठेवायला आवडतं. चांगला स्वयंपाक करता येतो. त्यामुळे त्या घर सांभाळतात. सध्या दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे.

advertisement

उज्ज्वला यांनी एके दिवशी पांडुरंग यांना स्वयंपाक करण्यास सांगितले होते. तेव्हा पांडुरंग यांनी पुऱ्या लाटल्या. तळल्या. आणि आमरस सुद्धा बनवले होते. हे जेवण कधीच विसरता येणार नाही, असं मत पांडुरंग आणि उज्ज्वला यांनी व्यक्त केलं. एव्हरिथिंग इज़ फेयर इन लव एण्ड वॉर असं म्हटलं जातं. परंतु आजच्या युगात बँक बॅलन्स, रंग, रूप पाहून प्रेम करण्याची प्रथाच पडली आहे. त्यामुळे प्रेमात काही युद्ध करण्याची गरज पडत नाही. परंतु उज्ज्वला आणि पांडूरंग या दाम्पत्याने निस्वार्थपणे प्रेमाचे धडे गिरवले असून सात जन्म सोबत राहणार असल्याची शपथ घेतलेली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लव स्टोरी/
Valentine Day: खरंच प्रेम आंधळं असतं? तुमचेही डोळे पाणावतील अशी डोळस Love Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल