समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील पिण्याच्या पाण्यापैकी 0.46 टक्के पाणी दूषित आहे. मुंबईला दररोज 3,950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांच्या मोठ्या जाळ्याद्वारे हा पाणीपुरवठा केला जातो. त्या जाळ्यांची वेळोवेळी साफसफाई न केल्यास पाणी दूषित होण्याची शक्यता असते. तसेच पावसाळ्यात पुराचं पाणी साचल्याने, वितरण प्रणालीतील जुन्या आणि नवीन बांधकामामुळे, झोपडपट्ट्यांमधील बेकायदेशीर नळ जोडणी, नळ गळती, खराब पाईप आणि योग्य देखभाल न केल्याने पाणी दूषित होऊ शकतं.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रावर अजूनही अस्मानी संकट दूर नाहीच! 4 जिल्ह्यांना अलर्ट
पालिकेकडून रोज जवळपास 150-180 आणि पावसाळ्यात किंवा आपत्कालीन काळात जवळपास 200-250 पाण्याचे नमुने विविध जलाशय तसेच जलवितरण प्रणालीमधून गोळा करून तपासले जातात. मानकानुसार, पिण्याचं पाणी कोलिफोर्म आणि ई-कोलाय या जीवाणूंपासून मुक्त असलं पाहिजेत. जर पिण्याच्या पाण्यात हे दोन घटक आढळले तर पाणी दूषित समजलं जातं.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी भांडुप येथे पाण्यावर ट्रीटमेंट केली जाते. तसेच पुढे वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचीही गुणवत्ता तपासली जाते. यामुळे अधिकाऱ्यांना पाण्याच्या गुणवत्तेची आणि त्याच्या संभाव्य धोक्यांची माहिती होते,
जे. जे. हॉस्पिटलमधील असोसिएट प्रोफेसर डॉ. मधुकर गायकवाड म्हणाले, "दुषित पाण्यामुळे अतिसाराचा त्रास होतो. पोटाचा संसर्ग होऊ शकतो. गॅस्ट्रो, काविळ, ई-कोलाय हे आजारही होतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यायलं पाहिजे."