अशाप्रकारे गाय आणि म्हैस दूध दरात झालीय वाढ
गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीम यांनी सांगितले की, "दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रतिलीटर 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील म्हैस दूधाच्या खरेदी दरात 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफसाठी प्रतिलीटर 50.50 वरून 51.50 रुपये करण्यात आला आहे.
advertisement
इतरही महत्त्वाचे निर्णय
"त्याचबरोबर 6.5 फॅट आणि 9.0 एसएनएफसाठी प्रतिलीटर 54.80 वरून 55.80 रुपयापर्यंत करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी प्रतिलीटर दूध खरेदी दरात 32 रुपयांवरून 33 रुपये करण्यात आला आहे. संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा या विषयांवरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत", अशी माहिती नविद मुश्रीफ यांनी दिली.
हे ही वाचा : Weather Alert: ऑगस्टअखेर पावसाचा जोर, मुंबईत वारं फिरलं, कोकणात यलो अलर्ट, आजचा हवामान अंदाज
हे ही वाचा : "तुमचा अतिरेक्यांशी संबंध आहे", डाॅक्टर पिता-पूत्रास घातली भीती; लुटले तब्बल 43 लाख, कोल्हापूरात खळबळ!
