याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना दाखल करण्यासाठी गुरुवारपर्यंत (4 सप्टेंबर) मुदत देण्यात आली होती. शेवटच्या दिवशी 264 हरकती जमा झाल्या. 27 गावांतून 3 हजार 500 पेक्षा जास्त हरकती जमा झाल्या असून एका व्यक्तीच्या नावे 200 पेक्षा हरकती आहेत.
MHADA Lottery 2025: अर्जविक्रीतून म्हाडाची चांदी! सव्वा लाख अर्जांतून मिळाले 6,35,00,000 रुपये
advertisement
याचिकाकर्ते संदीप पाटील यांच्या मते, प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा निकष पाळला गेलेला नाही. पॅनल पद्धतीला विरोध करणारी याचिका न्यायप्रविष्ट आहे. 27 गावांनी प्रभाग रचनेला विरोध आहे. शिवाजीनगर आणि वालधुनी हे परिसर राजकीय हेतूने कल्याण पश्चिमशी जोडले गेले आहेत. हे परिसर कल्याण पूर्वेशी जोडले जावेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी सगळ्यात प्रथम हरकत नोंदविली होती. त्यांनी कायदेशीर पद्धतीने नोटीस देत हरकत घेतली. प्रभाग रचना ही उत्तरेकडून होणे अपेक्षित आहे. यानुसार, प्रभाग रचना टिटवाळ्यातून होणे अपेक्षित आहे मात्र, ती उंबर्डे सापर्डे येथून करण्यात आली आहे.
मनसेनेही मैदनात
27 गाव संघर्ष समितीचे सत्यवान म्हात्रे म्हणाले की, 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा प्रश्न सुप्रिम कोर्टात गेलेला आहे. या 27 गावांना महापालिकेत राहायचे नाही. त्यांच्यावर महानगरपालिकेची निवडणूक जबरदस्तीने लादली जात आहे.
दरम्यान, हरकती सूचनांवर 5 ते 12 सप्टेंबरदरम्यान सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. त्यासाठी विशेष अधिकारी नेमला गेला आहे.