MHADA Lottery 2025: अर्जविक्रीतून म्हाडाची चांदी! सव्वा लाख अर्जांतून मिळाले 6,35,00,000 रुपये
- Published by:Vrushali Kedar
 - local18
 
Last Updated:
MHADA Lottery 2025: म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,285 फ्लॅट आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात आली.
मुंबई: मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये जागेच्या आणि घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना स्वत:च्या हक्काचं घर घेता येत नाही. अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) मदतीला धावून येत असतं. सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉटरीच्या केवळ अर्जविक्रीतूनच म्हाडा मालामाल झालं आहे. अर्जविक्रीतूनच म्हाडाला कोट्यवधी रुपये मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे 5,285 फ्लॅट आणि 77 भूखंडांच्या विक्रीसाठी जुलै महिन्यात लॉटरी काढण्यात आली. 14 जुलैपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्याने म्हाडाने दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता इच्छुकांना 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
advertisement
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या दीड महिन्यांत 1 लाख 27 हजारांहून अधिक नागरिकांनी म्हाडाच्या घरासाठी अनामत रकमेसह ऑनलाइन अर्ज भरले आहेत. प्रत्येक अर्जामागे म्हाडाला 500 रुपये मिळत आहेत. म्हणजेच फक्त अर्जांच्या माध्यमातून म्हाडाला 6 कोटी 35 लाख रुपयांची कमाई झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर असल्याने ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान, गुरुवारी (4 सप्टेंबर) संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, 1 लाख 60 हजार 721 लोकांनी घरासाठी अर्ज केला आहे. 1 लाख 27 हजार 191 जणांनी अर्जासह अनामत रक्कम देखील भरली आहे. ही अनामत रक्कम लॉटरी निघाल्यानंतर संबंधितांना परत केली जाणार असली तरी अर्जाचे 500 रुपये म्हाडाला मिळणार आहेत.
कोकण मंडळाच्या लॉटरीतील घरं अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील असून त्याची किंमत 12 ते 50 लाख रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडून लॉटरीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.
advertisement
सरकारचाही फायदा
view commentsम्हाडाच्या 500 रुपये शुल्कावर 18 टक्के जीएसटी लावला जात आहे. त्यामुळे प्रत्येक अर्जामागे सरकारला देखील 90 रुपये मिळत आहेत. त्यामुळे म्हाडाप्रमाणेच केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटीपोटी संबंधित अर्जदारांकडून 1 कोटी 14 लाख रुपयांची कमाई झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MHADA Lottery 2025: अर्जविक्रीतून म्हाडाची चांदी! सव्वा लाख अर्जांतून मिळाले 6,35,00,000 रुपये


