याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यंदा डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट मार्गावरील मेट्रो सेवा सुरू झालेली आहे. त्यामुळे गणपती पाहण्यासाठी येणारे भाविक मेट्रोचा वापर करत आहेत. पुणे मेट्रोच्या इतिहासात एका दिवसांत सर्वाधिक प्रवाशांचा नवा उच्चांक शनिवारी प्रस्थापित झाला. सध्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू आहे. गेल्या वर्षी गणपती विसर्जनादिवशी उच्चांकी 3 लाख 46 हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. यावर्षी शनिवारी 3 लाख 68 हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी सलग 41 तास मेट्रो सुरू राहणार आहे.
advertisement
Pune News : ऐन गणपतीत पुणेकरांना गुड न्यूज! वाहतूक कोंडी सुटणार, सिंहगड उड्डाणपुलाच आज लोकापर्ण
'मंडई'त सर्वाधिक गर्दी
पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे प्रवासी मंडई मेट्रो स्टेशनला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या स्टेशनवरून शनिवारी 56 हजार 131 प्रवाशांनी प्रवास केला. कसबा, मंडई ही मेट्रो स्टेशन शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपती पाहण्यासाठी जवळ पडतात. त्यामुळे या दोन स्टेशन्सवरती आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मेट्रो प्रशासनाकडून सुविधा आणि गर्दी नियंत्रणासाठी नियोजन केलं जात आहे.
महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक (जनसंपर्क) चंद्रशेखर तांभवेकर म्हणाले, "गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी भाविकांसाठी मेट्रो सोयीची ठरत आहे. मंडई मेट्रो स्टेशनवर होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रोकडून तयारी केली गेली आहे. नागरिकांनी कसबा स्टेशनवर उतरून मध्यवर्ती भागात देखावे पाहण्यासाठी जावे. देखावे पाहिल्यानंतर मंडई स्थानकावरून परतीचा प्रवास करता येईल."