सातपुडा पर्वतरांगेला लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबापाणी गावाजवळ ही घटना घडली. यात वादळात मध्यरात्री घर कोसळलं आणि चौघं जागीच ठार झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. यात पती-पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे. या वादळाने अख्खं कुटुंबच उद्धवस्त केलं आहे.
beed accident : बीडमध्ये दुचाकींचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू , 1 गंभीर जखमी
advertisement
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी घटनास्थळी रात्रीच भेट दिली. यानंतर रात्री या चौघांचे मृतदेह शिवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यावलला वादळाचा तडाखा
यावलला शनिवारी सायंकाळीही वादळाचा तडाखा बसला. त्यात रावेर तालुक्यातील 29 गावांमधील 600 हेक्टर केळी आडवी झाली. 7 गावांत 345 घरांवरील पत्रे उडाले. बोदवडमध्ये 53 खांब, 7 रोहित्र आडवे पडले. यामुळे तालुक्यातील 20 गावे 24 तासांनी सुद्धा विजेविना होती. यावल तालुक्यात 20 गावांना फटका बसला. मुक्ताईनगर तालुक्यात एक हजार हेक्टर केळी आडवी पडल्याचे समोर आले आहे.
