याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (26 सप्टेंबर) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर उभ्या असलेल्या दोन तरुणींची एका दुचाकीस्वाराने छेड काढली. हा प्रकार करून तो तरुण वेगात दुचाकी चालवत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, या दोन्ही तरुणींनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांनी त्या तरुणाला गाठून जाब विचारला. यावेळी बघ्यांची गर्दी जमली.
advertisement
संतप्त तरुणींनी त्याला फैलावर घेत त्याच्या कानशिलात लगावली. मुलींचा संताप पाहून नागरिकांनी धाव घेत तरुणाला चांगलाच चोप दिला. आपण पुरते अडकल्याचं लक्षात येताच त्याने तरुणींची हात जोडून माफी मागितली. तरुणाने गयावया करून, तरुणींची माफी मागितली. 'पुन्हा छेड काढशील, तर याद राख' असा इशारा देऊन त्याला सोडून देण्यात आलं.
तरुणाला सोडून देत तरुणी निघून गेल्या. त्यानंतर बराच वेळ संशयित रस्त्यावर बसून होता. यामुळे रहदारीत अडथळा निर्माण झाला होता. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही नोंद नव्हती.