हवामानाचा खेळ बिघडला
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि नव्याने तयार होणाऱ्या 'वेस्टर्न डिस्टरबन्स'मुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्याचा गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, याच काळात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचे सावट असल्याने शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे.
गारपीट, थंडी आणि पाऊस
जानेवारी महिन्याच्या अखेरीस हवामान खूप बिघडलं आहे. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे गारपीट तर कुठे हिमवृष्टी होत आहे. महाराष्ट्रातही 27 जानेवारी रोजी ठाणे, उपनगरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. मागच्या दोन तीन दिवसांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. महाराष्ट्रात त्यामुळे कमाल तापमानात २-३ अंशांनी वाढ झाली आहे. रात्री उकडत आहे. मात्र पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे.
advertisement
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचं संकट
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार झाला असून थंड वारे उत्तरेकडून येत आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात देखील गारठा कायम राहणार आहे. 30 जानेवारी रोजी पश्चिमी विक्षोभ तयार होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देखील हवामानावर होणार आहे. अरबी समुद्रातून उष्ण वारे देखील उत्तरेच्या दिशेने जात आहेत. 2 दिवसांमध्ये 2-4 डिग्री तापमान पुन्हा खाली घसरण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर पुढचे चार दिवस तापमान हळूहळू वाढणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात हवामानाचे अपडेट
उत्तर महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस हळूहळू 2-3 डिग्री तापमान घसरणार आहे. त्यानंतर पुढचे 3 दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमानात फारसा बदल होणार नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कुठे पडणार पाऊस?
कोकणात मुख्यत्वे ढगाळ वातावरण राहील. त्यामुळे दमट आणि उष्ण असल्याने उकाडा जाणवेल. पहाटेच्या वेळी गार वाऱ्यांमुळे थोडासा दिलासा मिळेल. पश्चिम महाराष्ट्रात मळभ राहील. उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची सर्वाधिक शक्यता आहे. जळगाव, नाशिक, धुळ्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. या दरम्यान ४० किमी सोसाट्याचा वारा वाहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आदी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, विजांचा कडकडाट शक्य आहे.
