मक्यास चांगला उठाव
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 28 हजार 033 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 6597 क्विंटल मक्याची आवक झाली. त्यास कमीत कमी 1470 ते 1746 रुपये दरम्यान प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 444 क्विंटल मक्यास 2500 ते 3800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्यांची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 3 लाख, 31 हजार 291 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख, 41 हजार 417 क्विंटल लाल कांद्यांची सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 411 ते जास्तीत जास्त 1440 रुपयांपर्यत बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्कटमध्ये आवक झालेल्या 490 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 2300 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
सोयाबीन आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 35 हजार 592 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये सर्वाधिक 7659 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 5428 ते 5657 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच बुलढाणा मार्केटमध्ये 1250 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 5350 ते 5800 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.





