गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या नामदेव तराळे याच्या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसील पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करत त्याच्या ताब्यातून एकूण चार लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर तंबाखूजन्य पदार्थ कुठून आणले, कोणत्या मार्गाने पुरवठा होत होता आणि यामागे आणखी कोणी आहे का, याचा सखोल तपास तहसील पोलीस करीत आहेत.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 5:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरात साडे तीनशे किलो वेगवेगळ्या फ्लेवरचे तंबाखूजन्य पदार्थ, नामदेवला पोलिसांनी उचलला
