TRENDING:

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर मृत्यूचा स्पॉट, Activa चा भयानक अपघात, झाले 2 तुकडे; तरुण जागेवरच गेला!

Last Updated:

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका ते वेरळदरम्यान जगबुडी नदीवरील असलेला हा पूल तीव्र उतार आणि अवघड वळणाचा असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच अपघात झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

खेड: मुंबई-गोवा महामार्गांवर अपघाताची मालिका काही केल्या कमी होत नाही. आज पुन्हा एकदा महामार्गावर एका स्कुटरचा भीषण अपघात झाला आहे. जगबुडी नदीच्या पुलावर हा अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील ब्लॅक स्पॉटमधील एक ब्लॅक स्पॉट असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका ते वेरळ दरम्यान जगबुडी नदीच्या पुलावर ही घटना घडली. एक तरुण एक्टिव्हा स्कुटरवरून वेरळ ते भरणे असा भरधाव प्रवास करत होता.  जगबुडी नदीच्या पुलाजवळ पोहोचला असताना अचानक त्याचं स्कुटरवरच नियंत्रण सुटलं आणि स्कुटर पुलाच्या संरक्षण कठड्याला धडकली.

advertisement

हा अपघात इतका भीषण होता की, एक्टिव्हा स्कुटरचे दोन तुकडे झाले. या अपघातात एका स्कुटरस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे अपघातानंतर दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले होते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेमधून जखमींला तसंच मृत पावलेल्या दुचाकी स्वराला कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात हलवलं.

अपघाताचा नेहमी स्पॉट

advertisement

मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका ते वेरळदरम्यान जगबुडी नदीवरील असलेला हा पूल तीव्र उतार आणि अवघड वळणाचा असल्यामुळे त्या ठिकाणी नेहमीच अपघात झाले आहेत. कोकणातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी मोठे अपघात याच ठिकाणी झाले आहेत. हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधला गेला असल्याचे देखील बोलले जाते. यासंदर्भात तक्रारी देखील दिल्या गेल्या आहेत. नुकतेच काही महिन्यांपूर्वी एक कार जगबुडी नदी कोसळून पाच जण ठार झाले होते. त्यानंतर अनेक वेळा दुचाकींचा अपघात होऊन देखील दुचाकीस्वरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

advertisement

शुक्रवारी देखील अवघड वळण आणि तीव्र उतरणार असलेला या रस्त्याच्या आणि पुलाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे आज देखील या स्कुटरचालकाचा पुन्हा अपघात झाला असून त्यात एकाला आपला जीव गमाववा लागला. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने हे अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा हायवेवर मृत्यूचा स्पॉट, Activa चा भयानक अपघात, झाले 2 तुकडे; तरुण जागेवरच गेला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल