TRENDING:

Aditya Thackeray : कुणाल कामराचं नेमकं काय बोलणं झोंबलयं हे एकनाथ शिंदेंनी सांगावं, आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Last Updated:

Aditya Thackeray On Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामरा याचं बोलणं का झोंबलंय हे एकनाथ शिंदे यांनी सांगावं असा उलट सवाल केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने तोडफोड केली आहे. तर, दुसरीकडे कुणाल कामराविरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्या वादावर राजकारण तापू लागले आहे. आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामरा याचं बोलणं का झोंबलंय हे एकनाथ शिंदे यांनी सांगावं असा उलट सवाल केला आहे.
News18
News18
advertisement

खारच्या युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्ये जाऊन शिवसेनेने कामराच्या कॉमेडी शोच्या निषेधार्थ तोडफोड केली. कुणाल कामरा याचा शो याच हॉटेलमध्ये पार पडला होता. हा शो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. या व्हिडीओत कुणाल कामरा याने अप्रत्यक्षपणे नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबनात्मक गाणे सादर केले. या गाण्यात गद्दार हा शब्ददेखील होता. त्यानंतर असलेल्या शेरेबाजीनंतर शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले.

advertisement

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचा निषे केला. भगत सिंह कोश्यारी, कोरटकर, राहुल सोलापूरकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरतात तेव्हा त्यांच्या घरावर कधी आंदोलन करतील का, सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनीच टोळीने आपला नेता चोर आणि गद्दार आहे हे ठरवले आहे का, शिंदे गटाच्या एका खासदाराने सापशी तुलना करताना फणा काढू असे म्हटले. एवढी नाचक्की कधी झाली नव्हती ती आता झाली आहे.

advertisement

मिरची का लागली हे सांगावं, आदित्यचा थेट सवाल...

गद्दार आणि चोर हे तेच आहेत असे एकनाथ शिंदे यांनी ठरवले का? कुणाल कामरा याने असे काय म्हटले ज्याने शिंदेंना झोंबलं आहे. एकनाथ शिंदे यांनी गद्दार चोर असल्याचे त्यांनी मान्य केलंय असा बोचरा सवालही आदित्य यांनी केला.

नागपूरमध्ये दंगल झाली, मुंबईत तोडफोड झाली. या अशा घटनांमुळे पर्यटक, गुंतवणूकदार राज्यातील येतील का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. शिंदे हे मुख्यमंत्र्‍यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. विधीमंडळाच्या कामकाजात हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्‍यांनी कामरा याने माफी मागावी असे म्हटले, त्यावर आदित्य यांनी म्हटले की, कोणाची माफी मागावी, गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेच आहेत हे त्यांनीच ठरवलं आहे का, असा प्रश्न त्यांनी केला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Aditya Thackeray : कुणाल कामराचं नेमकं काय बोलणं झोंबलयं हे एकनाथ शिंदेंनी सांगावं, आदित्य ठाकरेंचा थेट सवाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल