आदित्य ठाकरे म्हणाले, की भाजपचे अनेक लोक हेच सांगायला लागेल आहेत. महाराष्ट्र भाजपची परिस्थिती अशी झाली आहे की, 2 पक्ष आणि एक परिवार त्यांनी फोडला. पण हे सगळं करून घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपला काय मिळालं? त्यांचे जुने आणि भाजपचे जे खरे नेते आहेत ते फक्त 5-6 आहेत, बाकी सगळा इम्पोर्टेड माल आहे. तोही बाकी पक्षांचा रिजेक्टेड माल आहे, अशी टिका आदित्य ठाकरेंनी केली.
advertisement
सामनाची आग थांबवावी लागेल, अग्रलेखामुळे भाजप आक्रमक; बावनकुळेंनी दिला इशारा
पुढे त्यांनी सवाल केला, की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं? हा विचार त्यांचे कार्यकर्तेही कधी ना कधी करणारच आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. आदित्या ठाकरे म्हणाले, की मुख्यमंत्री डरपोक आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. भाजपला सुद्धा ते डरपोक आहेत हे पटलेलं आहे.
दरम्यान आदित्य ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. सिनेट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. नाशिक हा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की बालेकिल्ला कोणाचाही नसतो. मी मागच्या वेळीसुद्धा कोणावरही टीका केली नाही. मी युवकांशी चर्चा करण्यासाठी चाललो आहे. कॉलेजेससोबत माझा कार्यक्रम आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
