तावडे पाच कोटी घेऊन विरारमधील विवांत हॉटेलमध्ये पोहोचल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. ही बाब बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनीही हॉटेल गाठले. यानंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. सहा तासानंतर हा राडा शांत झाला. त्यानंतर तावडे आणि ठाकूर दोघेही एकाच गाडीतून रवाना झाले.
मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल
advertisement
दरम्या हा सगळा प्रकार सुरू असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाची बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धुलाई केल्याचा हा व्हिडिओ आहे. शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांना विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करत असल्याचे आरोपावरून मारहाण केली या मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर जोरदार व्हायरल झाला आहे.
बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांच्या गाड्यांची हवा काढली
भाजपच्या विनोद तावडे आणि इतर कार्यकर्त्यांच्या गाड्यांची हवा बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काढली. या गाड्यांमध्ये बॅगा असून त्या बॅगांमध्ये पैसे असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे नेते उमेश नाईक यांनी केला आहे.
विनोद तावडे सापडले हितेंद्र ठाकूर यांच्या तावडीत
विरारच्या विमानतळ हॉटेलमध्ये सकाळी नऊ वाजता कार्यकर्त्यांची मीटिंग भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी लावली होती . या मीटिंगमध्ये कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार होते. याचवेळी बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांना एका भाजपाच्या कार्यकर्त्याने केंद्रीय नेते विनोद तावडे हे पाच कोटी रुपये साठी आले आहेत अशी खबर दिली . त्या बातमीवरून क्षितिज ठाकूर आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये गोळा झाले त्यांनी एका रूममध्ये पैसे असल्याचे माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी नऊ लाख रुपये सापडल्याचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे .काही कार्यकर्त्यांना पकडून त्यांच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये काही पाकीट सापडले तर काही बॅगा सापडले आहेत. त्या बॅगांमध्ये भाजपाच्या डायऱ्या सापडले आहेत त्यामध्ये अनेकांना पैसे दिल्याचे नमूद केले आहे
