मढीच्या कानिफनाथ महाराजांची ही यात्रा होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत यात्रा सुरू असते. या यात्रेबाबत ग्रामसभा झाली. मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी घालावी, अशी मागणी करणारी पत्रे विविध गावातून आल्याचे सरपंच तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सभेत सांगितले. या पत्राची दखल घेत ग्रामसभेपुढे मरकड यांनी हा विषय मांडला. पारंपरिक पद्धतीनुसार देवाला महिनाभर अगोदर तेल लागलेले असते. असा कालावधी मढीच्या ग्रामस्थांच्या दृष्टीने दुखवट्याचा असतो. या काळात ग्रामस्थ तळणे, लग्नकार्य, शेतीकामे, प्रवास असे कार्य पूर्णपणे बंद करून घरामध्ये पलंग, गादीही वापरत नाहीत. महिनाभर कौटुंबिक सर्व कामे बंद ठेवून सर्व ग्रामस्थ नाथांच्या सेवेमध्ये स्वतःला झोकून देतात.
advertisement
हिंदूंच्या भावनांना ठेच...
मढी येथे येणारे व्यापारी परंपरा पाळत नाहीत. त्याशिवाय मटका, जुगार खेळले जातात. त्यामुळे हिंदूंच्या भावनांना ठेच बसल्यासारखे वातावरण झाले असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. कुंभमेळ्यात काही ठिकाणी मुस्लीम, व्यापाऱ्यांना बंदी केली. तशी मढी यात्रेत मुस्लीम व्यावसायिकांना बंदी करावी, अशी मागणी अनेकांनी केली आहे. त्यानुसार ग्रामसभेच्या ठरावात मुस्लीम व्यावसायिकांना मढी यात्रेमध्ये बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरपंच मरकड यांनी सांगितले. ग्रामसभेतील ठरावावर आता प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.
