घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातमधील एस. एस. ट्रेडिंग नावाची कंपनी आहे. ज्या कंपनीकडून लसूण, कांदा व इतर माल खरेदी, विक्री केला जातो. दरम्यान या कंपनीनं सिद्धिकी ब्रदर्स या कंपनीकडून 22,160 किलो लसूण खरेदी केला होता. ज्याची किंमत बाजारभावानुसार तब्बल 29,91,600 रुपये इतकी आहे. हा लसूण मध्यप्रदेशमधील निमजवरून बंगळुरूला पाठवण्यात आला.
advertisement
मात्र चालकानं अहमदनगर जिल्ह्यातील साकत शिवारात ट्रकला अपघात झाल्याचा बनाव करून ट्रकमधील लसूण मध्यस्थी व्यक्तीमार्फत परस्पर विक्री केला. या प्रकरणात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपींना अटक केली. पोलिसांकडून मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
September 18, 2023 11:07 AM IST
