अहिल्यानगर येथील राहता तालुक्यातील चितळी या गावात तृतीयपंथियांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारून शेळीपालन व्यवसायाची सुरुवात केली. तृतीयपंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे.
Success Story : घरात बसून काम नव्हतं, गृहिणीनं निवडलं आवडीचं क्षेत्र, आता दुसऱ्यांना देतात रोजगार!
advertisement
चितळी येथे 80 तृतीयपंथी भगिनींनी मिळून 5 वर्षांपूर्वी संस्थेच्या नावावर तीन एकर जागा घेतली होती. आज समाज कल्याण विभागाच्या पाच लाख रुपयांच्या शासकीय मदतीतून साधारण 2 हजार चौरस फूट क्षेत्रात पशुपालन शेड उभारण्यात आलं आहे. सध्या या केंद्रात 16 बकऱ्यांचे पालन केले जात आहे. तसेच शेजारीच एक हजार चौरस फूट क्षेत्रात निवासस्थानांचे बांधकाम देखील सुरू आहे. या जागेत निवासस्थान, कुपनलिका व तारेच्या कुंपणासाठी सामाजिक संस्थेने मदत केली आहे, असे दिशा पिंकी शेख यांनी सांगितले.
शेळीपालन व्यवसायामुळे तृतीयपंथी भगिनींना आर्थिक मदती बरोबर आत्मसन्मानही मिळणार आहे. हा प्रकल्प राज्याच्या व देशाच्या पातळीवर एक आदर्श ठरावा व तृतीयपंथीयांना या प्रकल्पाला बघून ऊर्जा मिळावी हा एकमेव उद्देश आहे. त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने व स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार असल्याचंही शेख म्हणाल्या.





