Success Story : घरात बसून काम नव्हतं, गृहिणीनं निवडलं आवडीचं क्षेत्र, आता दुसऱ्यांना देतात रोजगार!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
Last Updated:
सध्या अनेक महिला व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. अहिल्यानगरमधील अश्विनी पुंड यांनी आवड म्हणून साईजेन एज्युकेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली आहे. या व्यवसायातून 4 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न कमवतात.
अहिल्यानगर : सध्या अनेक महिला व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. नवनवीन व्यवसाय सुरू करत आहेत. अहिल्यानगरमधील राहता तालुक्यातील अश्विनी पुंड यांनी आवड म्हणून साईजेन एज्युकेशन अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडची सुरुवात केली आहे. त्याआधी त्या गृहिणी होत्या. सध्या या व्यवसायातून वर्षाला 4 ते 5 लाखापर्यंत उत्पन्न कमवतात.
अश्विनी पुंड यांनी सुरुवातीला एका छोट्या रूममधून हा व्यवसाय चालू केला होता आणि आता ते प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कोर्सेस घेतात. त्यात एम एस सी आय टी, कम्प्युटर हार्डवेअर, टायपिंग, टॅली, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच महिलांसाठी फॅशन डिझायनिंग, पार्लर आणि मेहंदी सर्टिफिकेट कोर्सेस चालवतात. जवळपास त्यांच्याकडे एका बॅचमध्ये 50 ते 60 विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे शिवण क्लासमध्ये पण जवळजवळ 20 ते 30 महिला आहेत.
advertisement
तसेच गव्हर्नमेंटचे फ्री कोर्सेस पण उपलब्ध आहेत जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येईल. आत्ताच नव्याने सुरू केलेला फॅशन डिझायनिंगचा सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स घेत आहेत. त्यांच्याकडे प्लेसमेंट पण घेतले जातात आणि प्लेसमेंटमधूनच आत्तापर्यंत खूप विद्यार्थी सिलेक्ट होऊन जॉब करत आहेत. तसेच त्यांच्याकडे काही महिला स्टाफ आहेत. त्या महिलांना स्वतःचा व्यवसाय चालू करण्यास प्रोत्साहन देत आहेत. सुरुवात छोटी जरी असली तरी कामात सातत्य ठेवून प्रामाणिकपणे काम केलं तर एक दिवस यश नक्कीच भेटतं आणि प्रत्येक महिलांनी बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, असं अश्विनी कुंड म्हणतात.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 20, 2025 3:25 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : घरात बसून काम नव्हतं, गृहिणीनं निवडलं आवडीचं क्षेत्र, आता दुसऱ्यांना देतात रोजगार!