अहिल्यानगर जिल्ह्यातील फोफसंडी हे चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. या गावात सूर्योदय दोन तास उशिरा होतो आणि सूर्यास्त दोन तास आधी होतो. त्याला गावाची भौगोलिक स्थिती कारणीभूत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वात कमी सूर्यप्रकाश असणारं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. या गावाच्या नावाचा इतिहास देखील रंजक आहे.
शेतीच्या मशागतीसाठी ना पैसे ना बैल, 65 वर्षांच्या शेतकरी आजी आजोबांनी स्वत:ला जुंपलं, VIDEO
advertisement
फोफसंडी नावाचा इतिहास
भारतात ब्रिटिशांची राजवट होती तेव्हा फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य गावात जात असे. यावरूनच ‘फॉप संडे’ असं नाव पडलं. पुढे त्याच शब्दांचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव पडलं.
फोफसंडी या गावाबद्दल
या गावाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे. नदी, धबधबा हिरवाई डोंगर असल्याने गर्द हिरवी वनराई दुर्मिळ पशुपक्षी या गावात आढळतात. 1200 लोकसंख्या 12 वाड्या व 12 आडनावाचे लोक इथे राहतात. फोफसंडी या गावातील मुख्य व्यवसाय शेतीच आहे. इथे पावसाळ्यातील चार महिने शेती करतात. त्यात मुख्यतः भात, नागली, वरई ही पिके घेतली जातात.
पावसाळ्यात अनेक पर्यटक या ठिकाणी फिरायला येतात. फोफसंडीचा धबधबा खूप लोकप्रिय आहे. अजूनही या गावातील लोक गुहेत राहतात. या गावात तुफान पाऊस पडतो. मांडवी नदीचा उगम फोफसंडी गावाच्या हद्दीतच होतो. तिथल्या एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्य केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीचे नाव मांडवी पडल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, चारही बाजूने डोंगराने वेढलेलं आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव जणू धावपळीच्या जीवनातून मुक्त होऊन निसर्गात रमण्याचे ठिकाण आहे.





