काय आहे प्रकरण?
संगमनेर शहर पोलीस ठाण्यालगतचा कारागृह फोडून गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींनी पलायन केले होते. या घटनेने संगमनेरच्या उपकारागृहाची सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आलेली असतानाच आता या प्रकरणात अवघ्या तीस तासांतच नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये मुसंडी मारीत चारही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. तसेच त्यांना मदत करणाऱ्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हा अन्य विभागाच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी एकूण सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल ऊर्फ थापा, आनंद छबु ढाले, मच्छिद्र मनाजी जाधव, तसेच त्यांना मदत करणारे दोन जण असे एकूण सहा जण यामध्ये आरोपी आहेत. यांच्यावर 120 कलाम वाढवण्यात आले आहे, आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या मार्गावर होते.
advertisement
जेलमधून कैदी पळून गेल्याने संगमनेर पोलिसात खळबळ उडाली होती. कारागृहातील कैद्यांना गुटखा, तंबाखू, बाहेरचे जेवण, मोबाईल आदी सुविधा सहज उपलब्ध होत असल्याचा आरोप अनेकदा झाला आहे. या प्रकरणामुळे नागरिकांनी देखील पोलिसांच्या कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्य न दाखवल्याने चार जणांनी गज कापून पलायन केले असल्याची चर्चा सुरू आहे. दिवसाढवळ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगार पळ काढत असतील तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाचा - दिवाळीला लेकरांसोबत फटाके फोडायचं राहुन गेलं, घराकडे जाताना गाडीसोबत भंयकर घडलं, पालघरमधील घटना
घटनेची पुनरावृत्ती
वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या उपकारागृहाचे गज तोडून गुन्हेगारांनी पलायन केल्याची घटना घडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची झोप उडाली होती.
