Palghar Accident : दिवाळीला लेकरांसोबत फटाके फोडायचं राहुन गेलं, घराकडे जाताना गाडीसोबत भंयकर घडलं, पालघरमधील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Palghar Accident : ऐन सणासुदीत डहाणू येथे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.
पालघर, 10 नोव्हेंबर (राहुल पाटील, प्रतिनिधी) : शुक्रवारपासून देशभरात दिवाळीला सुरुवात झाली आहे. लोकांनी मोठ्या संख्येने गावाची वाट धरली आहे. परिणामी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसत आहे. त्यामुळे अपघात वाढण्याचा धोकाही कैक पटीने वाढला आहे. कासा डहाणू राज्यमार्गावरील वधना येथे आज एका भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. ऐन सणासुदीत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कसा घडला अपघात?
कासा डहाणू राज्यमार्गावरील वधना येथे दुपारच्या सुमारास खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक आणि पीकअप वाहनात समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर सहाजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही भरधाव वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्याने एका वळणावर हा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी झालेल्या सहा ते सात जणांवर कासा उपजिल्हा रुग्णालय तसच डहाणू ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
दोन्ही खाजगी वाहनांमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे मजूर असून ते दिवाळीनिमित्त घरी परतताना हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. डहाणू कासा महामार्गावर सूचना फलकांचा अभाव आणि धोकादायक असलेली वळण यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. पालघरच्या ग्रामीण भागात खाजगी वाहनांमधून अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना देखील आरटीओ विभाग ही याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
November 10, 2023 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar Accident : दिवाळीला लेकरांसोबत फटाके फोडायचं राहुन गेलं, घराकडे जाताना गाडीसोबत भंयकर घडलं, पालघरमधील घटना


