अहमदनगर भाजपामध्ये नेहमीच नाराजी पाहायला मिळते, त्यात भाजपाचे नेते आमदार राम शिंदे हे नेहमीच आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवतात. त्यातच विखेंना विरोध करणारे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि राम शिंदे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे,
2019 च्या निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये भाजपाच्या काही आमदारांचा पराभव झाला होता. त्यामुळे आमच्या पराभवाला विखे जबाबदार असल्याचा आरोप काही आमदारांनी केला होता. आमदार राम शिंदे यांनी वेळोवेळी आपली नाराजी वरिष्ठ स्तरावरून तर कधी स्थानिक पातळीवर बोलून दाखवली आहे. राम शिंदे हे मोहटा देवीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी नेहमीच विखेंच्या विरोधात भूमिका घेणारे पारनेरचे आमदार इंग्लिश लंके यांनी एकत्र गाडीने प्रवास केल्याने नवीन राजकारण शिजते का? अशा चर्चा जिल्ह्यात सुरू झाल्या. मात्र, यावर बोलताना राम शिंदे म्हणाले युतीचं सरकार आहे, त्यामुळे एकत्र झाल्याने त्यात काही वावगं नाही.
advertisement
वाचा - 'माझ्या बॅगमध्ये 8 शर्ट, शाईफेक झाली की लगेच बदलतो अन्'; चंद्रकांत पाटलांनी सांगितली स्ट्रॅटेजी
यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले महाराष्ट्रात युतीचे सरकार आलं आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन घेतलेल्या निर्णयाची काटेकोरपणे अहमदनगर जिल्ह्यामध्ये युतीचा धर्म काटेकोरपणे पाळला जात आहे. त्यामुळे त्यात काही वावगे नाही. उलट येणाऱ्या निवडणुकांमध्ये मोठ्या मतांनी भाजपाचा खासदार निवडून येईल यात कुठलीही शंका नाही.
