दोन मित्रांचा मृत्यू
अकोले येथील घटनेत 6 जणांच्या मृत्यूची घटना ताजी असताना पुन्हा एकदा दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली. प्रवरा नदीपात्रात हे दोन तरुण पोहायला गेले होते. आदित्य रामनाथ मोरे (वय 17 वर्ष रा. घुलेवाडी) आणि श्रीपाद सुरेश काळे (वय 17 वर्ष रा. कोळवाडे) अशी दोन तरुणांची नावे आहेत. नदी पात्रातील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते बुडल्याची प्राथमिक माहिती आहे. अवैध वाळू उपसा होत असल्याने पात्रात खड्डे पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
advertisement
शोधायला आले अन् जीव गमावला
दुधवारी (22 मे) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 वर्षे) आणि सिन्नर तालुक्यातील सागर पोपट जेडगुले (वय 25 वर्षे) हे दोन तरुण अंघोळीसाठी सुगाव बुद्रुक जवळील प्रवरा नदी पात्रात आले होते. अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेजण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह बाहेर काढला. मात्र, अर्जुन जेडगुले याचा शोध लागला नव्हता. 23 जानेवारीला सकाळी धुळे येथून SDRF च्या पथकाला पाचारण करण्यात आले. SDRF च्या जवानांचं शोधकार्य सुरु झालं. आणि त्याच ठिकाणी 6 जनांची बोट उलटून ते पाण्यात बुडाले. SDRF च्या इतर जवानांनी त्यांना वाचवण्यासाठी दुसरी बोट पाण्यात उतरवली. जीवाची बाजी लाऊन SDRF चे जवान सर्वांना वाचवण्याचे प्रयत्न करीत होते. मात्र, निसर्गाच्या पुढे कोणाचे काहीच चालले नाही. दुसऱ्याला शोधायला आलेल्या जवानांनी आपला जीव धोक्यात घातला आणि दुर्दैवाने त्यांचाच जीव गेला.
वाचा - पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; आईवडिलांनी वाचवण्यासाठी घेतली धाव पण..
यामध्ये SDRF चे PSI प्रकाश नाना शिंदे, कोन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, DRIVER वैभव सुनील वाघ यांचा कर्तव्य बजावत असताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार, कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत. तर SDRF च्या मदतीला गेलेले सुगाव बुद्रुक येथील स्थानिक गणेश मधुकर देशमुख आणि 22 जानेवारीला बुडालेला तरूण अर्जुन रामदास जेडगुले यांचा शोध अजूनही सुरू आहे.
