Pune News : पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; आईवडिलांनी वाचवण्यासाठी घेतली धाव पण..

Last Updated:

Pune News : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू
पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू
पुणे, (रायचंद शिंदे, प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील एका शेततळ्यामध्ये बुडून शेतमजूर कुटुंबातील 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुलं खेळताखेळता शेततळ्यात उतरल्यानंतर पोहता येत नसल्याने बुडाली. मात्र, त्यावेळी कोणीही जवळ नसल्याने त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. या घटनेनंतर कुटुंबाने एकच आक्रोश केला.
कशी घडली घटना?
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे आज दुपारी साडेतीन वाजता शेततळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ही मुले शेतमजूर कुटुंबातील आहेत. श्रद्धा काळू नवले (वय 13) सायली काळू नवले (वय 11) दीपक दत्ता (वय- 7 राहणार- कान्हेवाडी राजगुरुनगर) राधिका नितीन केदारी (वय -14 राहणार कानेवाडी राजगुरुनगर)अशी मृत मुलांची नावे आहेत. श्रद्धा आणि सायलीही दोन्ही मुले गोरक्षनाथ बबन कवठे (राहणार जवळे बाळेश्वर संगमनेर जिल्हा नगर) यांनी दत्तक घेतली होती.
advertisement
शवविच्छेदनासाठी मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी हृदयद्रावक आक्रोश केला. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रेय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात बुडालेल्या मृतात 3 मुलींचा व 1 मुलाचा समावेश आहे. शेततळ्याशेजारी खेळता खेळता ही मुले शेत तळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह मंचर ग्रामीण रूग्णालयात येथे दाखल केले आहे. या घटनेमुळे आदिवासी शेत मजूर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
advertisement
परिसरात हळहळ
कवठे हे शेतमजुरीचे काम करत आहेत. ही दोन्ही भावंडे निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय शिक्षण घेत होते. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुले शेततळ्याजवळ खेळत होती. ही मुले बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कवठे त्यांची पत्नी ज्योती तातडीने शेततळ्याजवळ गेले. पण तोपर्यंत मुलांची प्राणज्योत मालवली होती. देवेंद्र शेठ शहा फाउंडेशन रुग्णवाहिका चालक स्वप्निल मोरे यांनी भीमाशंकर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने चारही मुलांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात शेततळ्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; आईवडिलांनी वाचवण्यासाठी घेतली धाव पण..
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement