आज 1 डिसेंबरपासून या राशींनी संघर्षाची तयारी ठेवा! साडेसाती सुरू, एक चूक करेल मोठं नुकसान

Last Updated:
Astrology News : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाचे देवता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह आपल्या धीम्या पण प्रभावी हालचालीमुळे प्रत्येक राशीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतो.
1/7
astrology news
ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायाचे देवता मानले जाते. व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देणारा हा ग्रह आपल्या धीम्या पण प्रभावी हालचालीमुळे प्रत्येक राशीच्या जीवनात मोठे बदल घडवून आणतो. 28 नोव्हेंबर 2025 रोजी शनि मीन राशीत मार्गी झाले असून, या बदलाचा परिणाम येत्या काही महिन्यांत सर्व 12 राशींवर जाणवणार आहे. मात्र यापैकी तीन राशींसाठी हा काळ विशेषतः कठीण आणि आव्हानात्मक ठरू शकतो, असा इशारा ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे.
advertisement
2/7
astrology
मार्गी अवस्थेमुळे मोठा बदल शनि आतापर्यंत वक्री अवस्थेत होते आणि 28 नोव्हेंबरपासून त्यांची थेट गती सुरू झाली आहे. ही अवस्था 2027 पर्यंत प्रभावी राहणार असून या काळात शनि नक्षत्र बदलेल आणि पुढील काळात मेष राशीत संक्रमणही करेल. या सर्व बदलांचा एकत्रित परिणाम म्हणून काही राशींना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विशेषतः ज्या राशी सध्या साडेसातीच्या प्रभावाखाली आहेत, त्यांच्यासाठी हा काळ कठीण परीक्षा घेणारा ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार जुलै 2026 पर्यंत या राशींना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
मेष
मेष : राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असल्यामुळे या राशीच्या जातकांसाठी आगामी काळात आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. मार्गी अवस्थेमुळे कामात अडथळे, योजनांमध्ये विलंब आणि सतत ताणपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. घाईघाईत निर्णय घेतल्यास नुकसान होण्याची भीती आहे. आर्थिक व्यवहारात विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. करिअरमध्ये अनिश्चितता वाढू शकते. मानसिक ताण आणि झोपेच्या समस्या जाणवू शकतात.
advertisement
4/7
कुंभ
कुंभ : साडेसातीचा अंतिम टप्पा आरोग्याबाबत सतर्कता आवश्यक. कुंभ राशी शनीच्या साडेसातीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. हा टप्पा सर्वात जास्त धावपळ, खर्च आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा मानला जातो. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित मोठी काळजी घ्यावी लागेल. रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.खासकरून हृदय, सांधे आणि पचन तंत्राशी संबंधित त्रास वाढू शकतो. कर्ज व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
advertisement
5/7
astro
मीन : मीन राशीचे लोक साडेसातीच्या दुसऱ्या आणि सर्वात वेदनादायक टप्प्यातून जात आहेत. शनी मार्गी झाल्यामुळे जबाबदाऱ्या वाढण्यासोबतच अनेक अनपेक्षित आव्हाने समोर येऊ शकतात. करिअरमध्ये अडथळे, प्रकल्पांमध्ये अडचणी आणि अनपेक्षित नुकसान होण्याची शक्यता. आर्थिक तंगी, कर्ज किंवा नुकसान होऊ शकते. एखादे गुपित उघड होण्याची शक्यता असून त्यामुळे प्रतिमेला तडा जाऊ शकतो. सन्मान, प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता यांची परीक्षा होऊ शकते.
advertisement
6/7
astro
उपाय काय करावे? ज्योतिषशास्त्रानुसार या काळात संयम, नियमशिस्त आणि शांतता राखणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. दानधर्म, सेवा, प्रामाणिकपणा आणि अध्यात्मिक साधना केल्यास शनीची कडवट फळे कमी होतात, असे मानले जाते.
advertisement
7/7
astrology
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
• 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

• 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

• 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement