Mumbai Weather : मुंबईतील हवामानात पुन्हा मोठे बदल, कोकणात पारा घसरला, पाहा आजचं हवामान
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
पहाटेच्या सुमारास कोकणात गारवा अधिक जाणवत आहे आणि किनारी भागातसुद्धा सकाळचे तापमान खाली घसरू लागले आहे. याचाच परिणाम मुंबई महानगर आणि उपनगरातही जाणवतो आहे.
डिसेंबरचा पहिलाच दिवस आणि हिवाळ्याची खरी चाहूल आता जाणवू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकण पट्टीत थंडीच्या वातावरणात अचानक उष्णतेची हलकी लाट जाणवत होती पण आता ती स्थिती बदलू लागली आहे. पहाटेच्या सुमारास कोकणात गारवा अधिक जाणवत आहे आणि किनारी भागातसुद्धा सकाळचे तापमान खाली घसरू लागले आहे. याचाच परिणाम मुंबई महानगर आणि उपनगरातही जाणवतो आहे. गेल्या आठवड्यापेक्षा आज अधिक थंड हवेसह दिवसाची सुरुवात होणार आहे.
advertisement
advertisement
नवी मुंबई–ठाणे आणि कल्याण भागात थोडी जास्त थंडी जाणवेल. येथे सकाळचे तापमान सरासरी 16–18 अंश सेल्सिअस या दरम्यान असेल, म्हणजेच गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत थोडी अधिक घट. पालघर परिसरात मात्र सर्वाधिक गारवा राहण्याची शक्यता असून येथे तापमान 15–17 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येऊ शकते. दिवसा तापमान उबदार राहील पण उष्णतेची तीव्रता जाणवणार नाही.
advertisement
पालघरमध्ये पहाटे आणि सकाळी हवेचे तापमान साधारण 15–17 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता असून, कालच्या तुलनेत 1–2 डिग्रीने तापमान खाली आले आहे. बोईसर, डहाणू, तलासरी आणि जव्हार–मोखाडा सारख्या अंतर्गत भागात थंडी अधिक प्रकर्षाने जाणवते. यामध्ये विशेषतः डहाणू किनारी पट्टीत सकाळचा गारवा जास्त जाणवतो तर जव्हार आणि मोखाडा सारख्या डोंगराळ गावात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
कोकणात आता थंडीची पकड मजबूत होताना दिसते आहे. आठवडाभर अधूनमधून तापमानात चढ–उतार दिसत होते; परंतु 1 डिसेंबरच्या सकाळपासून तापमान स्पष्टपणे खाली आले आहे. रायगड जिल्ह्यात पहाटेचे तापमान 17–19 अंश सेल्सिअस , तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 18–20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. किनाऱ्यावरच्या भागात दिवसा साधारण उबदार वातावरण मिळेल; पण सूर्य मावळल्यानंतर पुन्हा थोडा गारवा झटक्यात वाढेल. काही ठिकाणी कालच्या तुलनेत 1–2 अंश सेल्सिअसने तापमान खाली घसरले असून हवेतील कोरडेपणा वाढल्याने थंडीची जाणीव अधिक जाणवते.


