Vengurla Boat Accident : इंदापूर-प्रवरानंतर आता वेंगुर्ल्यात बोट पलटली; 4 जण बेपत्ता
- Published by:Shreyas
Last Updated:
इंदापूरनंतर महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. वेंगुर्ला बंदर येथे बोट पलटल्यामुळे 7 जण समुद्रात बुडाले आहेत.
विशाल रेवडेकर, प्रतिनिधी
वेंगुर्ला : इंदापूरनंतर महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. वेंगुर्ला बंदर येथे बोट पलटल्यामुळे 7 जण समुद्रात बुडाले आहेत, यातल्या तिघांनी पोहत समुद्र किनारा गाठला. तर मध्य प्रदेशमधील 3 तर रत्नागिरीमधील एक खलाशी बेपत्ता झाले आहेत.
वेंगुर्ला बंदर येथून माशांचा बर्फ आणि इतर सामान घेऊन एकूण 7 खलाशी मोठ्या बोटीच्या दिशेने निघाले होते. यावेळी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने आणि उधाणाने बोटीने आपला मार्ग बदलला आणि ती भरकटली. समुद्रात शोधकार्य सुरू असून अद्याप दोन बेपत्ता युवकांचा शोध सुरू आहे. त्यासाठी एनडीआरफचं हेलिकॉप्टर तसंच ndrf च्या बोटींच्या माध्यमातून शोधमोहीम सुरू आहे.
advertisement
प्रवरामध्येही बोट बुडाली
view commentsयाआधी प्रवरा नदीच्या भोवऱ्यात बोट बुडून तीन जणांचा मृत्यू झाला, तर या तिघांना वाचवायला गेलेल्या एसडीआरएफच्या तीन जवांनानाही जीव गमवावा लागला आहे. तर उजनीच्या पात्रातही बोट बुडाल्यामुळे सहा जणांचा बुडून मृत्यू झाला, यात एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा समावेश होता.
Location :
Vengurla,Sindhudurg,Maharashtra
First Published :
May 24, 2024 4:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vengurla Boat Accident : इंदापूर-प्रवरानंतर आता वेंगुर्ल्यात बोट पलटली; 4 जण बेपत्ता


