Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई

Last Updated:

Raid on Shahajibapu Patil Office : सांगोल्यात शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. रात्री उशिरा शिंदे गटाच्या सभेनंतर ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे.

भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजी बापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
सोलापूर: राज्यातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारात महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसले. हे मतभेद वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सांगोल्यात शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. रात्री उशिरा शिंदे गटाच्या सभेनंतर ही कारवाई झाल्याचे वृत्त आहे. शहाजीबापूंच्या निकटवर्तीयांवरही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे.
नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काही जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे दिसून आले. सांगोल्यातही तसेच चित्र दिसले. सांगोल्यात शिंदे गटाचे नेते माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याविरोधात भाजप, शेकाप आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आघाडी केली आहे. सांगोला नगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात त्यांचे कट्टर विरोधक शेकापला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकत्र आणलं. भाजपनेच कोंडी केल्याने शहाजी बापू पाटील चांगलेच नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी व्यक्त देखील केली होती.
advertisement

प्रचार सभेनंतर छापेमारीची कारवाई...

सांगोल्यात रविवारचा दिवस साधत शिंदे गटाची मोठी सभा पार पडली. या सभेनंतर शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाने छापा टाकत संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्याशिवाय, त्यांच्या निकटवर्तीयांवरही छापेमारीची कारवाई झाल्याचे वृत्त आहे. छापेमारीत काय सापडलं, काही जप्त करण्यात आले का, याची माहिती समोर आली नाही. सत्तेत असूनही कारवाई झाल्याने शिंदे गटाचे स्थानिक कार्यकर्तें चांगलेच नाराज झाले आहेत. निवडणुकीत लक्ष्य करण्यात आल्याने शहाजीबापू आधीच नाराज आहेत. अशातच आता छापेमारीच्या कारवाईने त्यांच्या नाराजीत आणखीच वाढ होण्याची भीती आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement