अण्णा हजारेंचा खुलासा
हायकोर्टामध्ये झालेल्या तक्रारीबाबत मला कुठलीही माहीत नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. अर्ज कुणी केला आहे हे मला अद्यापही माहित नाही. असा अर्ज केल्याचं मला प्रसारमाध्यमांमधून समजले. मला न कळवता हा अर्ज केल्याचा अण्णा म्हणाले, त्यामुळे हे चुकीचं असल्याचंही अण्णांनी सांगितलं.
काय म्हणाले अण्णा हजारे?
advertisement
शिखर बँक घोटाळा प्रकरणी 2005 ते 2010 या कालावधीमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलं होतं. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अण्णा हजारे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. यामध्ये अजित पवार यांच्यासह तत्कालीन संचालक मंडळावरती ठपका ठेवण्यात आला होता. यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. मात्र, या रिपोर्टला आव्हान देत या याचिकेचे मूळ तक्रारदार सुरेंद्र अरोरा यांनी हायकोर्टामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला हरकत घेत या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु, या अर्जाचा आणि माझा कुठलाही संबंध नाही. या प्रकरणात कोणी काय केले, मला माहित नाही. या याचिकेत माझंही नाव होतं. त्यामुळे अर्ज करण्याआधी मला विचारायला हवं होतं. परंतु, असे झाले नाही त्यामुळे हे चुकीचं असल्याचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे.
वाचा - एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातील शिलेदार फोडला
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांना दिलासा
शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासर इतर आरोपींना क्लीन चीट देण्यात आली आहे. तपासयंत्रणेने जानेवारी महिन्यात शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जाहीर केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीमुळे बँकेला नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने म्हटलंय.
