Maharashtra politics : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातील शिलेदार फोडला

Last Updated:

शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे, ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे.

News18
News18
ठाणे, राजा मयाल, प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मीरा भाईंदरमधील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका व शहर अध्यक्ष तारा घरत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तारा घरत यांनी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान मीरा भाईंदर शहरातील आणखी दोन माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
तारा घर या ठाकरे गटाच्या शहर अध्यक्ष आहेत, तसेच त्या माजी नगरसेविका देखील आहेत. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान मीरा भाईंदर शहरातील आणखी दोन माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  महानगर पालिका निवडणुकीपूर्वी हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला हिंगोलीमध्ये देखील मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून हिंगोलीमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छूक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज होते. अखेर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. जयप्रकाश मुंदडा यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंदडा यांनी मुंबईमध्ये शिवसेनेते प्रवेश केला. हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, वसमतचे तालुकाप्रमुख राजू चापके, ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांची देखील यावेळी उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाने हिंगोली लोकसभेचे तिकीट नाकारल्यापासून माजी मंत्री मुंदडा हे पक्षावर नाराज होते. अखेर या नाराजीतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Maharashtra politics : एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातील शिलेदार फोडला
Next Article
advertisement
Shahajibapu Patil : भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मोठी कारवाई
भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो
  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

  • भाजप-शिंदे गट वाद पेटणार? शहाजीबापूंच्या कार्यालयावर छापेमारी, जाहीर सभेनंतर मो

View All
advertisement