TRENDING:

Environment Day 2025 : पर्यावरण प्रेमी असावा तर असा, 15 वर्षांपासून राबतोय उपक्रम, केली तब्बल 4000 झाडांची लागवड, Video

Last Updated:

डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे हे गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी अनेक उपक्रम घेतात. आत्तापर्यंत त्यांनी 4000 वृक्षरोपण केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहिल्यानगर : भविष्याचा विचार करता पर्यावरणाचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. शासनाकडून अनेक उपक्रम राबवण्यात येतातच, पण काही पर्यावरणप्रेमी हे फक्त पर्यावरण दिनानिमित्त नाही तर वर्षभर पर्यावरणासाठी काम करतात. असेच राहता तालुक्यातील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे हे गेल्या 15 वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी अनेक उपक्रम घेतात.
advertisement

डॉ. पानगव्हाणे हे गेल्या 15 वर्षांपासून यावर काम करत आहेत. त्यांनी सहाय्यक फाउंडेशनची सुरुवात केली. या फाउंडेशनअंतर्गत ते पर्यावरण संरक्षण उपक्रम घेतात. ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण हळूहळू त्यांचा एक ग्रुप तयार झाला. आत्तापर्यंत त्यांनी 4000 वृक्षरोपण केले आहे.

Shevgyachya Panachi Bhaji: आरोग्यासाठी फायदेशीर, घरीच बनवा शेवग्याच्या पानांची भाजी, एकदम सोपी रेसिपी, Video

advertisement

प्रत्येक आठवड्यात ते पर्यावरणासंबंधी उपक्रम राबवतात. त्यातील वृक्षरोपण करणे, सायकल रॅली काढणे तसेच स्वच्छता अभियान राबवतात. त्याचप्रमाणे जर कोणाचा वाढदिवस असेल त्यानिमित्ताने वृक्षरोपण करतात. तसेच वर्षश्राद्ध किंवा दहाव्याचा कार्यक्रम असेल तर त्या व्यक्तीची एक आठवण म्हणून वृक्षरोपण करतात. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी जवळपास 200 ते 250 वृक्षरोपण केले आहे.

View More

तसेच वृक्षारोपणच नाही तर ते दर आठवड्याला सायकल रॅली काढतात व पर्यावरणाच्या दृष्टीने व आरोग्याच्या दृष्टीने सायकल चालवण्याचे महत्त्व काय आहे याबद्दल समाजात जागृती निर्माण करतात. त्याचप्रमाणे या उपक्रमाअंतर्गत ते आठवड्याला स्वच्छता अभियानही राबवतात व पर्यावरणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

डॉ. पानगव्हाणे यांच्यामध्ये असलेले पर्यावरणाबद्दलचे प्रेम आणि पर्यावरण संरक्षणासाठी करत असलेली धडपड हे पाहून एकच गोष्ट समजते की जर एखाद्या गोष्टीत आपल्याला आवड असेल तर काही करण्यासाठी कोणताच विशेष दिवस नसतो. तर फक्त आपल्याला जे करता येईल ते रोज एक छोटासा प्रयत्न करून आपण करू शकतो. तसेच ते छोटासा प्रयत्न करत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काम करतात.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Environment Day 2025 : पर्यावरण प्रेमी असावा तर असा, 15 वर्षांपासून राबतोय उपक्रम, केली तब्बल 4000 झाडांची लागवड, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल