TRENDING:

लग्नाच्या हळदीत जेवणं पडलं महागात! रात्री 200 लोक जेवले आणि सकाळी सर्वच्या सर्व रुग्णालयात

Last Updated:

200 लोकांनी रात्री हळदीच्या जेवणावर ताव मारला आणि सकाळी त्यांच्यासोबत धक्कादायक घडलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिश दिमोटे/अहमदनगर : लग्न म्हटलं की हळद आली आणि हळद म्हटलं की जेवण आलंच. लोक लग्नात जेवायला जावो न जावोत पण लग्नाच्या हळदीत मात्र जेवायला आवर्जून जातात. अशाच एका हळदीचं जेवण जेवणं लोकांना चांगलंच महागात पडलं आहे. रात्री हे लोक जेवले आणि सकाळी त्यांच्यासोबत धक्कादायक घडलं. अहमदनगरमधील धक्कादायक घटना आहे.
हळदीचं जेवले, सकाळी रुग्णालयात
हळदीचं जेवले, सकाळी रुग्णालयात
advertisement

अकोले तालुक्यातील करवंदरा येथील येथील सोमा दगडू भांगरे यांचा मुलगा सखाराम याचा विवाह पाडोशी येथील रामभाऊ साबळे यांच्या मुलीशी शुभविवाह निश्चित झाला होता. नवरदेवाकडे हळदीचा कार्यक्रम मंगळवारी रात्री होता. ग्रामस्थ आणि नातेवाईक पकडून 200 लोक जेवणासाठी आले होते. जेवणात भात, डाळ, भाजी, गोड पदार्थ असा मेन्यू होता.

रात्रीची वेळ... कार्यक्रमाहून घरी परतत होते 35 लोक, पण एकही घरी पोहोचला नाही, रस्त्यात भयंकर घडलं

advertisement

रात्री जेवल्यानंतर सकाळी काही वऱ्हाडी पाडोशीला जात होते. काहींना सकाळपासूनच तर काहींना पडोशीला पोहोचल्यावर त्रास होऊ लागला. त्यांना उलट्या, जुलाब होऊ लागले. पण काहींना रस्त्यातच त्रास सुरू झाला. त्यांना उलट्या, जुलाब होऊ लागल्या. त्यांना तातडीने राजूर रुग्णालय, कोहणे, खिरविरे रुग्णालयात हलवण्यात आलं. यात महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे.

advertisement

अन्न विषबाधा म्हणजे काय?

हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

advertisement

अन्न विषबाधेची लक्षणं

अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात.

अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

ओटीपोटात दुखणे, पेटके

अतिसार

उलट्या, मळमळ

भूक न लागणे

अशक्त वाटणे

डोकेदुखी

Healthy Drinks : जेवणानंतर प्या या 5 हर्बल ड्रिंक्सपैकी कोणतेही एक; होणार नाही अपचन आणि गॅसेस

अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात

advertisement

अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.

102°F पेक्षा जास्त ताप आहे.

पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.

तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.

लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
लग्नाच्या हळदीत जेवणं पडलं महागात! रात्री 200 लोक जेवले आणि सकाळी सर्वच्या सर्व रुग्णालयात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल