रात्रीची वेळ... कार्यक्रमाहून घरी परतत होते 35 लोक, पण एकही घरी पोहोचला नाही, रस्त्यात भयंकर घडलं

Last Updated:

सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व लोक गेले होते.

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
भोपाळ :  कधी, कुठे, कसं, काय घडेल सांगू शकत नाही. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. 35 लोक एका कार्यक्रमाहून घरी परतत होते पण त्यापैकी एकही घरी पोहोचला नाही. रस्त्यातच त्यांच्यासोबत भयंकर घडलं. मध्य प्रदेशमधील ही घटना आहे.
दिंडोरीच्या बिचिया-बर्झार गावात मोठी दुर्घटना घडली आहे. 28-29 फेब्रुवारीच्या रात्री उशिरा एका पिकअप वाहनाचा ताबा सुटून त्या परिसरात उलटला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. तर 21 जण जखमी झाले आहेत.
सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व लोक शाहपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील अमाही देवरी गावातून मसुरघुघरी पोलीस स्टेशन हद्दीतील वस्तीत गेले होते. बारझार घाटात परतत असताना त्यांच्या पिकअप वाहनाचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन 20 फूट खाली शेतात पलटी झाले.
advertisement
धूर समजून चालकाने रेल्वे थांबवली; पुढच्याच क्षणी काहींचा गेला जीव
बुधवारी (28 फेब्रुवारी) झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघाताने खळबळ उडाली आहे. जामतारा-करमातांड येथील कलझरियाजवळ रेल्वेने काही प्रवाशा धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. यात काहींचा मृत्यू तर काही लोक जखमी झाल्याची बातमी आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी पोहोचले आहे. ट्रेनला आग लागल्याची अफवा पसल्याने प्रवाशांनी गाडीतून उड्या टाकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत होते.
advertisement
बंगळुरू-यशवंतपूर एक्स्प्रेस डाऊन लाईनवरुन जात होती. त्याचवेळी रेल्वेरूळाच्या शेजारी टाकलेल्या भरावाची धूळ उडाली. हे पाहून आग लागल्याने धूर निघत असल्याचा चालकाचा समज झाला. संभाव्य धोका टाळण्यासाठी त्याने गाडी थांबवली. अचानक आग लागल्याची गाडीत अफवा पसरली. त्यामुळे डब्यात गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण दरवाच्या दिशने धावू लागला. यात कोणताही विचार न करता प्रवाशांनी धडाधड उड्या टाकल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ईएमयू ट्रेनने प्रवाशांना चिरडलं.
advertisement
अपघातात 6 मजुरांचा मृत्य
उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्येही 26 फेब्रुवारीला भीषण अपघात झाला होता. कामावरून परतत असलेल्या मजुरांनी भरलेल्या ट्रॅक्टरला रोडवेज बसने टक्कर मारली. अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टरवर एकूण 12 मजूर होते. तर सुदैवाने बसमधील फक्त एक महिला जखमी झाली आहे. मृतांमधील 5 मजूर हे एकाच गावातील असल्याची माहिती आहे. रविवारी रात्री उशीरा 11 वाजता सिकरारा स्टेशन क्षेत्रातील समाधगंजमध्ये हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
advertisement
सिकरारा स्टेशन हत्तीतील तोहफापूर गावात रविवारी अलीशाहपूर गावातील काही मजूर हे छताचं मोल्डिंग करण्यासाठी गेले होते. आपलं काम पूर्ण केल्यानंतर हे 12 मजूर एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर मिक्सिंग मशीन लावून रात्री 11 वाजता घरी परतत होते. मात्र ट्रॅक्टर समाधगंजजवळ पोहोचताच हायवेवर चढला. यानंतर प्रयागराजहून गोरखपूर जात असलेल्या सिव्हिल लाइन्स डिपोच्या बसने मागुन याला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, ट्रॅक्टरचा चुराडा झाला. त्यामधील 5 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/देश/
रात्रीची वेळ... कार्यक्रमाहून घरी परतत होते 35 लोक, पण एकही घरी पोहोचला नाही, रस्त्यात भयंकर घडलं
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement