ज्या रस्त्यावर वृद्धेला चिरडलं तिथंच कारचालकासोबत भयंकर घडलं; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना

Last Updated:

कारने वृद्धेला धडक दिल्यानंतर ड्रायव्हर पळून जात होता पण त्याला ऑन द स्पॉट त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली.

कारची वृद्धेला धडक
कारची वृद्धेला धडक
पालघर : दररोज किती तरी अपघात होत असतात. अशीच एक अपघाताची घटना घडली ती पालघरच्या नालासोपाऱ्यात. जिथं एका कारचालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्धेला चिरडलं. यानंतर हा कारचालक पळून जात होता. पण जिथं त्यानं वृद्धेला चिरडलं तिथंच त्याच्यासोबतही भयंकर घडलं. त्याच्या कर्माच त्याला ऑन द स्पॉट शिक्षा मिळाली. पालघरच्या नालासोपाऱ्यातील ही धक्कादायक घटना आहे.
नालासोपाऱ्याच्या सत्पाळा राजोडी रस्त्यावर एका भरधाव एसयूव्ही कारने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या एका वेठबिगारी करणाऱ्या महिलेला जोरदार धडक दिली. त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नवशी बसवत (वय 65 वर्षे) असं मृत महिलेचं नाव आहे. ती सत्पाळा नाका ग्रामपंचायत कार्यालयामागे राहत होती. शनिवारी संध्याकाळी राजोडी रान इथून कामावरून सुटल्यानंतर ती आणखी एका महिलेसोबत राजोडी भीमनगर येथील रस्त्यावरून सत्पाळा येथील घरी जात होती. तेव्हा कारने तिला जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
महिलेला धडकल्यानंतर कारचालक पळून जात होता. पण स्थानिक ग्रामस्थांनी त्याला पकडलं. त्याच्यासह गाडीत आणखी एक प्रवासी होता. ग्रामस्थांनी दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. संतप्त जमावाने गाडीचीही तोडफोड केली.अर्नाळा सागरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. अर्नाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चालक कुलदीप मिश्रा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरात ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात असलेल्या गरवारे कंपनी जवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. संभाजीनगर पुणे महामार्गावर वाळूज परिसरात एका भरधाव ट्रकने दुचाकी वरून जाणाऱ्यास पाठीमागून जोरदार धडक दिली.
advertisement
या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आय्युबखान पठाण असं मृत तरुणाचं नाव आहे, तो मनीषानगर, वाळूजचा राहणारा होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्या रस्त्यावर वृद्धेला चिरडलं तिथंच कारचालकासोबत भयंकर घडलं; नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement