TRENDING:

Maharashtra Elections : काँग्रेसमधील गटबाजी उफाळली, पक्ष श्रेष्ठींसमोरच दोन गटात जोरदार राडा

Last Updated:

काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाच्या नेत्यांसमोरच राडा झाला

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरीष दिमोटे,अहमदनगर : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांसाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे. पक्षाच्या नेत्यांसमोरच राडा झाला असून विद्यमान आमदाराच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसमधील गटबाजी उफाळली, पक्ष श्रेष्ठींसमोरच दोन गटात जोरदार राडा
काँग्रेसमधील गटबाजी उफाळली, पक्ष श्रेष्ठींसमोरच दोन गटात जोरदार राडा
advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक मुजफ्फर हुसेन दाखल झाले होते. मात्र, त्यांच्यासमोरच काँग्रेसचे दोन गट आमने सामने आल्याचे शिर्डीत बघायला मिळालं. अशाप्रकारे पक्षशिस्तीला बदनाम करणं चुकीचं असून दोन चारशे जणांनी घोषणाबाजी करणं म्हणजे आमदार निवडून आणणं नसल्याचं सांगत हुसेन यांनी कार्यकर्त्यांची खरडपट्टी केली.

निवडून येण्यासाठी घोषणाबाजी पुरेशी नाही...

advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी आज पक्ष निरीक्षक मुज्जफर हुसेन यांच्यासमोर चव्हाट्यावर आली. विद्यमान आमदार लहू कानडे आपल्या समर्थकांसह मुलाखत देऊन बाहेर पडत असताना इच्छुक असलेल्या हेमंत ओगले यांच्या गटाने काँग्रेस पक्षाच्या आमदाराविरोधातच घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ या बैठकीत मोठा गोंधळ उडाला होता. अशा प्रकारे घोषणाबाजी करून पक्षाची बदनामी करू नका असं आवाहन करत निवडून येण्यासाठी केवळ घोषणा देणार दोन चारशे असून उपयोगी नसल्याचं मुज्जफर हुसेन यांनी सुनावले. तर स्वतःच्या पक्षाच्या आमदाराविरोधात घोषणाबाजी करणारे पक्षाचे कधीच असू शकत नाही असा टोला आमदार लहू कानडे यांनी लगावला.

advertisement

आमदारांविरोधात नाराजी..

काँग्रेस पक्षकडून मी उमेदवारी मागत आहे विद्यमान आमदारही उमेदवारी मागताहेत...दोघांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने घोषणाबाजी झाली असून ही लोकशाही असल्याचे इच्छुक उमेदवार हेमंत ओगले यांनी म्हटले. ही घोषणाबाजी म्हणजे आमदार लहू कानडे यांच्यावर मतदारसंघातील जनता नाराज असल्याचं हे द्योतक असल्याचेही ओगले यांनी म्हटले.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

2019 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार लहू कानडे यांना 93 हजार 906 मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांचा 18 हजार 906 मतांनी पराभव केला. शिवसेना उमेदवार कांबळे यांना 74 हजार 912 मते मिळाली होती. श्रीरामपूर मतदारसंघ हा काँग्रेसला अनुकूल असलेल्या मतदारसंघापैकी एक आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Maharashtra Elections : काँग्रेसमधील गटबाजी उफाळली, पक्ष श्रेष्ठींसमोरच दोन गटात जोरदार राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल