काळजी घेण्याच्या सूचना
अहमदनगर जिल्ह्यात डोळे येण्याच्या संसर्गामध्ये अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र सध्या जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ पसरू शकते. ही साथ अत्यंत सांसर्गिक आहे. तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ पसरू नये म्हणून आरोग्य विभागाने आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
advertisement
आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण
डोळे येण्याची साथ शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांमध्ये पसरू नये यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागांतील शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी जागोजागी भेटी देऊन सर्वेक्षण करत आहे. याबाबत जनजागृती करून आवश्यक माहिती दिली जात आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये या आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध केली आहेत, अशी माहिती डॉ. शामकांत शेटे यांनी दिली आहे.
वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात? मग या टिप्स नक्कीच फॉलो करा
काय आहेत लक्षणं?
डोळ्यांतून सतत पाणी येतं. डोळ्यांमध्ये सतत काहीतरी गेल्यासारखं वाटतं. डोळे लाल दिसतात आणि डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येते. डोळे चिकट होतात, सोबतच डोळ्यांच्या आतमध्ये खाज येण्याचे प्रकारही जाणवतात, असे डॉ. शेटे यांनी सांगितले.
संसर्ग झाल्यास काय करावं?
संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करणं टाळावं आणि डोळे स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावे. या काळात प्रवास करणं टाळावं आणि हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दीच्या ठिकाणी किंवा इतरांच्या जवळ जाणं टाळावं. संसर्ग झाल्यास वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही डॉ. शेटे सांगतात.





